फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरामनामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूरही दुमदुमले

रामनामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूरही दुमदुमले

नागपूर: पोद्दारेश्वर राममंदिरातून निघालेल्या शोभायात्रेसाठी खास रथ तयार करण्यात आला होता. या रथावर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाची प्रतिमा विराजमान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रभू श्रीरामाचे पुजन करण्यात आले. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, माजी मंत्री रमेश बंग, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा, अ‍ॅड. संजय बालपांडे, सरला नायक, विद्या कन्हेरे, प्रदीप पोहाणे, अजय तारवानी, बोधाराम तारवानी, अशोक गोयल, हर्ष अग्रवाल, सुरेश जैस्वाल, पुष्करलाल अग्रवाल, विजय अग्रवाल, राजेश रोकडे, नवल अग्रवाल, अनिल कुमार व सुनील कुमार गुप्ता, ताराचंद अग्रवाल यांनी श्रीरामाला पुष्पमाला अर्पण केली. रथाचे पुजन करून मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, महापौर यांनी रथाचा दोरखंड ओढून शोभायात्रेला प्रारंभ केला.
श्री पांचजन्य श्रीराम सेवक दलातर्फे ३५१ स्वयंसेवकांनी शोभायात्रेत शंखनाद करून अख्खा परिसर दुमदुमुन सोडला होता. पांढरे शुभ्र वस्त्र, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात शंख घेतलेले हे युवक मुख्य रथाच्या पुढे होते. नगाऱ्याचा दणदणाट, घंटाचा आवाज आणि शंखनादामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. त्याचबरोबर पिवळे वस्त्र परिधान करून डोक्यावर मंगल कलश घेऊन १०८ महिला शोभायात्रेत पायी चालत होत्या. रामधून पठण, हनुमान चालिसा पठण, उद्घोषणा करणारे पथक, स्केटिंगद्वारे नृत्याचे पथक, सिंधी छेज नृत्य, शिव गर्जना ध्वज पथक, लेझिम पथक, भांगडा नृत्य, श्रीराम वचनामृताचे फलक घेऊन चालणारे युवक असे एक भारावलेले वातावरण शोभायात्रेदरम्यान बघायला मिळाले.

या देशात सक्षम सरकार स्थापन व्हावे, असा आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन मागितला. ते म्हणाले की, देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आहे. आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतो. श्रीरामाने खºया अर्थाने सामान्य माणसाला जगण्याचा मार्ग दाखविला आहे. नागपूरची शोभायात्रा देशभरातील एक सांस्कृ तिक महोत्सव असून, सर्व धर्माचे लोक शोभायात्रेत सहभागी होऊन रामनामाचा जप करतात.

प्रभू श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. या देशातून उपासमारी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या संपावी, देशात रामराज्याची स्थापना व्हावी, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

मोमीनपुऱ्यात अमन शांती समितीतर्फे प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. श्रीराम विराजमान असलेल्या रथावर पुष्पवर्षाव करण्यात आला. देशात प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेतून सामाजिक ऐक्याचा संदेश देशभर पोहचावा, अशी अपेक्षा समितीचे अध्यक्ष बाबा खान, उपाध्यक्ष आसिफ कर्नल व महासचिव शेख आमिर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या