फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणबाळासाहेब असते तर 'पटक देंगे' म्हणण्याची अमित शहांनी हिंमतच केली नसती :...

बाळासाहेब असते तर ‘पटक देंगे’ म्हणण्याची अमित शहांनी हिंमतच केली नसती : भुजबळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासारखे कोणीही शिवसेनेला ‘पटक देंगे’ म्हणण्याची हिंमत करू शकले नसते, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना-भाजपच्या ‘नातेसंबंधा’कडे लक्ष वेधत टीका केली. शिवसेना ही संघटना असून ती कधीच संपणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या संघटनकाैशल्याचेही काैतुक केले.

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचे रविवारी राष्ट्रवादीच्या वतीने सिनेमॅक्स चित्रपटगृहात विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भुजबळ येताच तुतारी वाजवत, ठाकरे व भुजबळ यांच्या नावाचा जयघोष करत जुन्या शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. चित्रपट पाहिल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेची त्यावेळची आक्रमकता आणि आताची स्थिती वेगळी आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या