फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणअधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर

अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर

नागपूर,ता.२१ डिसेंबर २०२४: नागपूरात हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आणि अवघ्या काही तासातच बहूप्रतिक्ष्त मंत्री मंडळाच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली.आज अधिवेशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मंत्री मंडळाच्या यादीविषयी प्रश्‍न केला असता,त्यांनी आज ही घोषित होऊ शकते किवा उद्या ही यादी घोषित होऊ शकते,अश्‍या शब्दात सुहास्य चेह-याने  गुगली टाकली होती.तरी देखील अवघे मंत्री मुंबईत परतल्याशिवाय यादी जाहीर होणार नसल्याचा विश्‍वास पत्रकारांनाही होता मात्र,अधिवेशन संपताच ही यादी राजभवनातून जाहीर झाली अन् कोणाला कोणते खाते मिळाले आहे,हे स्पष्ट झाले.
ज्या गृहखात्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुसून बसले असल्याची चर्चा होती ती फोल ठरली व पुन्हा एकदा गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अबाधित राहीले आहे,याशिवाय त्यांनी उर्जा खाते देखील स्वत:कडे ठेवले असल्याने पुढील काळात उद्योगपती अदानीसोबतचे करार-मदार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष राहणार आहे.अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कायम असून पुन्हा एकदा नगर विकास हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आले आहे.चंद्रशेखर बावणकुळे यांना या वेळी देखील महत्वाचे महसूल हे खाते मिळाले आहे.गेल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे उर्जा खाते होते.
असे झाले खातेवाटप-
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (नवीकरणीय ऊर्जा विभाग वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
उप मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)
उप मुख्यमंत्री  अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.
मंत्री –
 चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
 राधाकृष्ण विखे पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
 हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांतदादा पाटील : उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य
 गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
 गणेश नाईक : वने
गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा आणि स्वच्छता.
दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
  संजय राठोड : मृद आणि जलसंधारण.
 धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण.
 मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता.
 उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा
 जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.
पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
 अतुल सावे : इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्ध व्यवसाय विकास, नवीकरणीय ऊर्जा
 अशोक उईके : आदिवासी विकास.
 शंभुराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
 आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
 दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
 आदिती तटकरे : महिला व बालविकास.
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
 माणिकराव कोकाटे : कृषी.
 जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायतराज.
 नरहरी झिरवळ : अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य.
 संजय सावकारे : वस्त्रोद्योग.
  संजय शिरसाट : सामाजिक न्याय.
 प्रताप सरनाईक : परिवहन
. भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास.
 मकरंद जाधव-पाटील : मदत व पुनर्वसन.
 नितेश राणे : मत्स्य व्यवसाय, बंदरे.
 आकाश फुंडकर : कामगार.
 बाबासाहेब पाटील : सहकार.
 प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
राज्यमंत्री – 
 आशिष जयस्वाल : वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार,
श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
डॉ. पंकज भोयार : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).
इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदू आणि जलसंधारण.
 योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.
OOOO
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या