फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणहिंदूत्वामुळे नव्हे भाजप ‘या’कारणामुळे सत्तेत..

हिंदूत्वामुळे नव्हे भाजप ‘या’कारणामुळे सत्तेत..

नाना पटोले यांचा आरोप
फडणवीसांच्या मंत्री मंडळामध्ये ६५ टक्के मंत्री हे ‘दागी‘
नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले
नागपूर,ता.२१ डिसेंबर २०२४: देशात व राज्यात काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज हा राष्ट्रीय पक्ष सत्तेत नाही,उलट काँग्रेसच्या धोरणांमुळेच भारतीय जनता पक्ष हा केंद्रात व राज्यात सत्तेत आला असल्याचे उघडपणे बोलले जात आहे,हिंदूत्वावर सवार होऊन व काँग्रेसच्या तृष्टिकरणाच्या नीतीमुळेच भाजप आज सत्तेत आहे,त्यामुळे ,केंद्रात व राज्यात काँग्रेसला पुन्हा सत्तेत जर यायचं असले तर काँग्रेसला आपल्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल,असं तुम्हाला वाटत नाही का?असा प्रश्‍न केला असता,भाजप हे हिंदूत्वामुळे नव्हे तर ‘ईव्हीएम’मुळे सत्तेत असल्याचे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.ते आज शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवशेनाचे सूप वाजल्यानंतर पत्र परिषदेत बोलत होते.
या प्रश्‍नावर बोलताना नाना म्हणाले,की निवडणूकीतील ईव्हीएमचा जो घोटाळा आहे तो अद्याप ही स्पष्ट झालेला नाही,राज्याचे मुख्यमंत्री हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहे,याचा अर्थ काय आहे हे सर्वांना माहिती आहे. हिंदूत्वाच्या किवा तृष्टिकरणामुळे हे सरकार सत्तेवर आलेले नाही,हे सरकारच निवडणूक आयोगाच्या कृपेने केंद्रात आणि राज्यात सत्तेत आलेले सरकार आहे,अशी प्रखर टिका याप्रसंगी नाना पटोले यांनी केली.केंद्राने आता एक नोटीफिकेशन काढून निवडणूक आयोगाने आता निवडणूक संबंधी कुठलीही माहिती कोणालाही देऊ नये,असे सांगितले आहे.यावरुन स्पष्ट झालेले आहे की ते ठरवतील तो कायदा,स्वायत्त संस्था इत्यादी प्रकार आता रहीला नाही.तुष्टिकरणाचा भाग जाऊ द्या,काँग्रेस हा देशाच्या संविधानानुसारच चालत राहणार.संविधानानुसार ,सर्वधर्म समभावावर देश चालावा ही भूमिका काँग्रेसची राहीली असल्याचे सांगून काँग्रेस त्याच भूमिकेवर चालत राहील,असे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना नाना म्हणाले की,नागपूर करारानुसार तीन पैकी एक हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतल्या जातं,ते आज पार पडलं असून अधिवेशनात विदर्भ,मराठवाडा या मागास भागाच्या समस्यांवर,उपायांवर चर्चा करण्याचं काम सरकार करीत असते.विरोधक म्हणून आम्ही शेतकरी,बेरोजगारी,गोरगरीबांचे प्रश्‍न,महागाईचा प्रश्‍न,अनुशेषाचा प्रश्‍न असेल,सातत्याने आम्ही विधान सभेत लाऊन धरले.त्याप्रमाणे बिड आणि परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या घटना,या माणुसकीला काळीमा लागलेल्या घटना घडल्या,गेल्या अडीच वर्षांमध्ये सरकारने जो ‘गुंडाईझम’या महाराष्ट्रात पोसला,माफिया तयार केले त्या माफियांचाच आता असर आपल्याला बिडमध्ये पाहायला मिळाला आणि पोलिसांनासुद्धा ज्या पद्धतीने सरकारच्या इशा-यावर,कायदा बाजूला सारुन काम करण्याची जी सवय पाडली,त्यामुळे पोलिसांमध्येसुद्धा एक प्रकारे ‘गुंडाराज’आला आहे का,हा प्रश्‍न उद् भवला असल्याचे ते म्हणाले.
परभणीतील घटना ही तर पोलिस व सरकार प्रायोजित आहे का?हा प्रश्‍न आम्ही विधान सभेत उपस्थित केला.खरे तर पहिल्याच दिवशी परभणीत जो उद्रेग झाला त्याच वेळी तो उद्रेग शांत करणे गरजेचे होते मात्र,तो संपूर्ण दिवस व दुस-या दिवशी देखील तो उद्रेग धुमसत राहीला,जिल्हाधिकारी कार्यालयात देखील समाधानकारण उत्तर न मिळाल्याने तो उद्रेग वाढत गेला आणि पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन केलं,त्यात कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सुर्यवंशी नावाचा विद्यार्थी याचा मृत्यू पोलिसांच्या कोठडीत झाला,तरी  देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत उत्तर दिलं की सोमनाथला दम्याचा त्रास होता,त्यांना आजार होता त्यात सोमनाथचा मृत्यू झाला,याचा अर्थ पोलिसांच्या कृत्याला पाठीशी घालण्याचं काम फडणवीसांनी केले असल्याची टिका त्यांनी केली.महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात जो जंगल राज निर्माण झाल त्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप करीत ,महिलेला पुरुष पोलिस मारत असतानाचे आपण परभणीच्या घटनेत बघितले.
बिडच्या घटनेत रेतीया माफिया आणि त्या माफियांना सरकारचा राजाश्रय असलेले गुंडं,त्यांना सरकार कसे पाठीशी घालतेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरातून आपल्याला मिळालं.फडणवीस हे एखाद्या निष्णात वकीलासारखे आपल्या अशिलाची बाजू विधान सभेत मांडत होते.तश्‍या पद्धतीचं उत्तर फडणवीस हे त्यांच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याला वाचवण्यासाठी देत होते.आरोपी वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी दिलेले उत्तर किवा मांडलेली बाजू ही मुख्यमंत्र्यांची नसून निष्णात वकीलाची होती,असा टोला त्यांनी हाणला.
एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात,कोणालाही सोडणार नाही,दुसरीकडे सहकारी पक्षाला घाबरुन त्यांची बाजू मांडतात.सहकारी पक्षाने साथ सोडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांची ही पाठराखण असावी,अशी शंका येते. त्यांच्याच पक्षाचे आमदार हे बिड जिल्ह्यातील घटनेचे क्रोर्य सभागृहात सांगत होते.आज तर आणखी एका त्यांच्या आमदारांनी पिक विम्याची पोलच सभागृहात खोलली,असे नाना यांनी भाजप आमदार सुरेश धस यांचे नाव न घेता सांगितले.तत्कालीन कृषि मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन धस यांनी पिक विमा योजनेतील कोट्यावधीचा घोटाळाच आज सभागृहात बाहेर काढला.हा पॅटर्न मोदी-शहांनी गुजरातसह संपूर्ण देशात लागू करावा,अशी मागणीच आमदार धस यांनी केली कारण त्यांच्या जिल्ह्यातील अश्‍या शेकडो शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला,ज्यांची आडनावे ही हिंदी भाषिक आहेत!
फडणवीसांच्या मंत्री मंडळामध्ये ६५ टक्के मंत्री हे ‘दागी‘असल्याचा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातच दागी मंत्री असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार?असा सवाल त्यांनी केला.

विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या आत्महत्या होतात.आमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात शेतक-यांची सरसकट कर्ज माफी केली होती.निवडणूकीत भाजप तसेच त्यांच्या सहकारी पक्षांनी शेतक-यांची कर्ज माफी पहील्याच अधिवेशनामध्ये करु,असे आश्‍वासन दिले होते.मग आज सरकारने ती घोषणा का केली नाही?

फडणवीस सरकारला आणखी किती शेतक-यांच्या आत्महत्या पाहायचा आहेत?असा सवाल करुन संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरीच आज अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्याप्रमाणेच गडचिरोली जिल्हा हा विदर्भाची आर्थिक राजधानी आहे इतकी विपूल खनिज संपदा या जिल्ह्यात आहे.मात्र,त्या जिल्ह्यात भांडवलशाहीतून खनिज संपदेची बेशुमार लृट चालली असल्याचा आरोप नाना यांनी केला.जोपर्यंत गडचिरोलीत उद्योग उभे होत नाही तोपर्यंत तेथील खनिज संपदा बाहेर नेता कामा नये असे धोरण असताना सुद्धा कोणतेही उद्योग धंदे निर्माण न करता,देशाला या खनिज संपदेची गरज असल्याचे मुख्यमंत्री उत्तर देतात व आम्ही उत्खनन करु,उद्योग धंदेचं नंतर पाहू,असे उत्तर मुख्यमंत्री सभागृहात देतात!
याचा अर्थ हे सरकार महाराष्ट्राच्या शेतक-यांसाठी नाही,तरुणाईसाठी नाही,महिलांच्या सुरक्षतेसाठी नाही तर केवळ मूठभर उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.धारावीचा प्रकल्प देखील याच अधिवेशनात अदानीला देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला,यातून हे सरकार गरीबांसाठी नसून केवळ उद्योगपतींसाठी असल्याचे पहील्याच अधिवेशनात सरकारच्या कामकाजातून जनतेला कळले आहे,असा आराेप त्यांनी केला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर बिड जिल्ह्यात ३५ हत्या या पूर्वी झाल्या असल्याचे सभागृहात सांगितले आहे यावरुन बिड जिल्ह्यातील जंगलराज लक्षात येतो.ही कीड संपवण्याची जबाबदारी सरकारची होती कारण सरकार आणि पोलिसांनाच याची संपूर्ण माहिती होती.आरोपी वाल्मीक कराडवर कडक कारवाई होईल अशी आमची अपेक्षा होती मात्र आज घटनेला १३ दिवस उलटून देखील मुख्य आरोपीला अटक झाली नसल्याचे नाना म्हणाले.
…………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या