फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणयंदा परिवर्तन होणारच: प्रफूल्ल गुडधे यांचा दावा

यंदा परिवर्तन होणारच: प्रफूल्ल गुडधे यांचा दावा

मविआचे उमेदवार गुडधे यांनी नागपूर दक्षिण -पश्चिम मतदार संघातून दाखल केला उमेदवारी अर्ज
नागपूर, ता. २९ ऑक्टोबर २०२४:  सध्या सुरु असलेल्या पाडापाडीच्या राजकारणाला राज्यातील जनता वैतागली असून यंदा जनतेने परिवर्तनाची हाक दिली आहे.त्यामुळे परिर्वतन होणारच,असा दावा करीत ,आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, असा विश्वास महाविकास आघाडीचे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राचे उमेदवीर प्रफुल्ल गुडधे यांनी व्यक्त केला. आज, मंगळवारी  गुडधे यांनी संविधान चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. नंतर हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला गृहीत धरले आहे. शहरातील स्वतःला मोठे म्हणणारे नेते असतानाही नागपूरकरांना मुलभूत सुविधा पुरविण्यातही ते अपयशी ठरले. राज्यासह शहराचा विकास करण्यापेक्षा हे मोठे नेते दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, जनतेने निवडणून दिलेल्या सरकारला पाडण्यासाठी गलिच्छ राजकारण करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आता मतदार राजा आपला हक्क बजावून अहंकारी महायुती सरकारला त्यांची जागा दाखवणार असा विश्वासही यावेळी गुडधे यांनी व्यक्त केला.

प्रामुख्याने माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, माजी आमदार अशोक धवड, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे,  किशोर कन्हेरे, दिनेश वंजारी, प्रसन्ना बोरकर, प्रसन्ना जिचकार, पंकज निगोट, रेखा बाराहाते, विजय सरटकर, विनोद नागदेवते, प्रणिता शहाणे, प्रशांत ढाकणे यांची उपस्थित होते.
…………………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या