फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणसर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी देशमुख पित्रा-पुत्रांची व्याहाड ते मोवाड यात्रा

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी देशमुख पित्रा-पुत्रांची व्याहाड ते मोवाड यात्रा

नागपूर, १६ ऑक्टोबर २०२४:भाजपा प्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांचे पुर्णपणे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सामान्य जनता परेशान झाली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने व्याहाड ते मोवाड “लढा माझ्या शेतकऱ्याचा” यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख व सलील देशमुख यांनी दिली.

विदेशातुन मोठया प्रमाणात कापसाचे आयात होत असल्याने कापसाला भाव मिळत नाही. सध्या संत्रा व मोसंबीला मातीमोल भाव मिळत आहे. बांग्लादेशला संत्रा पाठविण्यासाठी अगोदर १८ रुपये कर लागत होता. आता तोच कर १०८ रुपये झाला आहे. यामुळे संत्रा व मोसंबीची निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सोयाबीन तेल व सोयापेंड मोठया प्रमाणात आयात करण्यात येत असल्याने सोयाबीनला भाव मिळत नाही. नुकसान होवूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. पिक विमा कंपनीकडुन जाचक अटी लावुन मदत देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. दुसरीकडे खते, फवारणीचे औषध, शेतकी अवजारे यांच्यावर मोठया प्रमाणात जि.एस.टी. लावल्याने त्याचे भाव वाढले आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बाजारात आज जो शेतमालास भाव मिळत आहे त्यातुन साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. खाण्याच्या तेला पासुन ते मिठापर्यत सर्वच वस्तुंच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. तरी सुध्दा राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले असे अनिल देशमुख व सलील देशमुख म्हणाले.

यात्रेचा हा पहिला टप्पा व्याहाड ते मोवाड असून ६ दिवसात ७० गावात ही यात्रा जाणार आहे. सकाळी ८ वाजतापासुन यात्रेला सुरुवात होईल व रात्री ८ वाजता त्या दिवशीची यात्र संपले. ज्या गावात ही यात्रा संपणार त्याच गावात यात्रेचा मुक्काम राहणार आहे. यात चावडी बैठका घेवून नागरीकांशी संवाद सुध्दा साधण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगीतले.

………………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या