फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणबांधकाम कामगारांच्या योजनेचा लाभ फक्त भाजप आमदारांनाच!

बांधकाम कामगारांच्या योजनेचा लाभ फक्त भाजप आमदारांनाच!

सलील देशमुखांची कोर्टात धाव: शुक्रवारी होणार सुनावणी

नागपूर,२ ऑक्टोबर २०२४: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु सध्याच्या परिस्थीतीत केवळ भाजपाचे आमदार असलेले आणि त्यांच्याच लोकांना या सर्व योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे इतर भागातील बांधकाम कामगार त्यांच्या हक्काच्या योजनेपासुन वंचीत राहत आहे. सर्वच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून शुक्रवारी यावर सुनावणी होणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.

राज्यातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने संसार उपयोगी साहीत्य, घरकुलासाठी मदत, मुलांच्या शिक्षणसाठी मदत यासह जवळपास २८ योजना राबविल्या जातात. राज्यातील लाखो बांधकाम कामगारांनी यासाठी नोंदणी सुध्दा केली आहे. आपल्या हक्काच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या कामगारांनी विविध योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सुध्दा केला आहे. यासाठी ते संबधीत कार्यालयात चकरा सुध्दा मारत आहे. परंतु त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार ज्या विधानसभेत आहेत तेथेच या योजना राबविण्यात येत असून केवळ भाजपाच्या लोकांनाच याचा लाभ देण्यात येत असल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला आहे.

आम्ही वारंवार विनंती करुन सर्व बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनेचा लाभ देण्याची विनंती संबधीत अधिकाऱ्यांना पत्र लिहुन स्वत: भेटुन केली. परंतु नेहमीच त्यांनी टाळाटाळ केली. राज्यासह विदर्भात आणि विशेष करुन नागपूर जिल्हात हजारो बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. परंतु त्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे भाजपाच्या आमदारांच्या मतदार संघात मात्र मोठया प्रमाणात शिबीरे घेवून काही ठरावीक लोकांना याचा लाभ देण्याचे काम सुरु आहे. हा प्रकार थांबून सर्वच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ अधिकाऱ्यांनी द्यावा या मागणीसाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचीका दाखल केली असून कोर्टाचे कामकाज ॲड. रितेश धावडा पाहणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.

 संविधान चौकातुन उद्या मोर्चा-
बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनेपासुन भाजपाचे नेते मंडळी विशेष करुन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस हे वंचीत ठेण्याचे काम करीत आहे. तसेच काही अधिकारी हे त्यांना यात मदत करीत आहे. भाजपाच्या नेत्यांच्या या धोरणाविरुध्द सलील देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवार दि. ३ ऑक्टोंबर २०२४ ला सकाळी १० वाजता नागपूर येथील संविधान चौकातुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बांधकाम कामगारांनी मोठया संख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन सलील देशमुख यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या