मुंबई – काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सोनिया गांधीसह प्रियांका गांधींचाही समावेश आहे. तसेच राज्यात खासदार अशोक चव्हाण, त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्यालोकसभा निवडणुकांचे मतदान ११ एप्रिल आणि १८ एप्रिललापार पडणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार हे स्टार प्रचारक करणार आहेत. विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रियांमुळे राधाकृष्ण विखे पाटील दुखावले गेले. त्यामुळेच नगरमध्ये प्रचाराला जाणार नसल्याचे विधानही विखे पाटलांनी केले होते. मात्र, आता काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता विखे पाटील प्रचार करणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे आहेत काँग्रेसचे स्टार प्रचारक