फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशपाकिस्तानी सैन्याला तो सच्चा सैनिकाप्रमाणे धैर्याने सामोरे गेला.

पाकिस्तानी सैन्याला तो सच्चा सैनिकाप्रमाणे धैर्याने सामोरे गेला.

मुलगा पाकिस्तानच्या तब्यात असतानाही प्रचंड धैर्य दाखवत अभिनंदनचे वडील म्हणाले, की माझा मुलगा जिवंत आणि सुखरूप असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. या अडचणीच्या काळात देशवासियांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. पाकिस्तानी सैन्याला तो सच्चा सैनिकाप्रमाणे धैर्याने सामोरे गेला. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो सुखरूपरित्या घरी परत येईल, असा मला विश्वास आहे.
बुधवारी पाकिस्तानच्या एफ-१६ या प्रकारच्या विमानांनी काश्मिरमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारताने मिग-२१ बायसन या प्रकारातील विमाने पाठवली होती. यावेळी झालेल्या हवाई युद्धात भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान खाली पाडले. त्याचा वैमानिक पॅराशूटमधून खाली उतरताना भारतीय सैन्याला दिसला होता. पण या झटापटीत अभिनंदन यांच्या विमानाचेही नुकसान झाले. त्यांनी विमानातून स्वतःला इजेक्ट केले. मात्र पाकव्याप्त काश्मिरात पडल्याने अभिनंदन शत्रूच्या हाती सापडले.
पाकिस्तानने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनंदन यांची चित्रफित दाखवण्यात आली. पाकिस्तानने अभिनंदन यांची लगेच सुटका करावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या