विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत
पंढरपूर: जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत. या शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रूपये अशी एकूण 20 लाखांची मदत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 42 भारतीय जवान शहीद झाले. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळला असून, देशभरात शोककळा पसरली होती. या हल्ल्यात देशासाठी प्राणाची बाजी लावणारे लढाऊ सैनिक आपण गमावले असून, यामध्ये महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन वीरपुत्रांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्त वारकरी सहभागी असून, या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमार्फत प्रत्येकी 10 लाख रूपये अशी एकूण 20 लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या योग्य निर्देशानुसार हा निधी मंदिर समितीमार्फत शहीदांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आ