फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशकेजरीवाल सरकारकडून शेतकऱ्यांना खूशखबर, दिल्लीत लागू होणार स्वामीनाथन आयोग

केजरीवाल सरकारकडून शेतकऱ्यांना खूशखबर, दिल्लीत लागू होणार स्वामीनाथन आयोग

नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारने शेतकNयांना आनंदाची बातमी दिली आहे. नवी दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार आहे. यासोबतच स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. यामुळे दिल्लीमधील शेतकNयांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत सांगितलं की, शेतकNयांसाठी खूशखबर:.दिल्ली सरकारचं क्रांतिकारी पाऊल. देशात पहिल्यांदाच स्वामीनाथन आयोग दिल्लीत लागू केलं जाणार आहे. यासोबतच केजरीवाल यांनी जनतेच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल असंही सांगितलं आहे.

देशातील शेतकNयांची परिस्थिती सुधारावी यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी कृषीवैज्ञानिक डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली २००० मध्ये शेतकरी आयोग स्थापन करण्यात आला. डिसेंबर २००४ ते ऑक्टोंबर २००६ या दोन वर्षांच्या काळात स्वामीनाथन आयोगाने भारताच्या २० राज्यांत प्रवास करून स्वयंसेवी संस्था, शेतकरी संघटना, कृषी महाविद्यालये, हवामान खाते, पाटबंधारे खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्ज पुरवठादार बँका अशा शेतीशी निगडीत सर्वच घटकांशी संवाद साधला आणि एकूण ५ अहवाल सरकार दरबारी सादर केले त्यापैकी पाचवा अहवाल ग्राह्य मानला जातो. स्वामीनाथन यांच्या मते या अहवालात शेती व्यवसायाशी निगडीत भारताच्या ७० टक्के जनतेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या