नवी दिल्ली– शहीद लान्स नायक नजीर अहमद वानी यांना मरणोत्तर अशोकचक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. पूर्वी दहशतवादी कारवायात गुंतलेले नजीर यांनी नंतर तो मार्ग सोडला. भारतीय लष्करात दाखल होत त्यांनी देशसेवेचे व्रत पत्करले. मात्र, गेल्या वर्षी शोपियात चकमकीमध्ये ते शहीद झाले होते.
पराक्रमाची गाथा : … इतक्यात गोळी डोक्यात घुसली!
वर्षी २३ नोव्हेंबरला नजीर अहमद वानी आपल्या सहकार्यांसह गस्तीवर होते. गुप्तचर विभागाकडून बटागुंड गावात हिजबुल आणि लष्कर ते ६ अतिरेकी लपलेले असल्याची माहिती मिळाली. अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आहेत. सैन्याने एन्काउंटर सुरू करण्यापूर्वी नजीर आणि त्याच्या टीमला अतिरेक्यांच्या पळून जाण्याच्या वाटा अडवण्याची जबाबदारी दिली. नजीरची टीम बटागुंड गावात पोहोचली.