फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशव्हिडिओकॉन कर्ज प्रकरण : धूत, कोचर दांपत्यावर गुन्हे; मुंबई, औरंगाबादेतील कार्यालयांवर सीबीआयचे...

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरण : धूत, कोचर दांपत्यावर गुन्हे; मुंबई, औरंगाबादेतील कार्यालयांवर सीबीआयचे छापे

पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओकॉन समूहाला ३२५० कोटी रुपयांचे कर्ज देऊन त्याबद्दल खासगी फायदा प्राप्त केल्याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चंदा यांचे पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि चार कंपन्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभर या तिघांशी संबंधित मुंबई आणि औरंगाबाद येथील चार कार्यालयांवर सीबीआयने छापे टाकले. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

सीबीआयच्या एफआयआरनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या फसवणुकीसह आरोपीने अपहाराचा कट रचला व खासगी कंपन्यांना कर्ज मंजूर केले. वेणुगोपाल धूत यांनी २०१२ मध्ये आयसीआयसीआयकडून ३२५० कोटींचे कर्ज घेतले. ६ महिन्यांनी दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्युएबल लिमिटेड कंपनीला व त्यांच्या नातेवाइकांच्या कंपन्यांना यातील करोडो रुपये दिल्याचा आरोप आहे. व्हिडिओकाॅन समूहाला ४० हजार कोटींचे कर्ज मंजूर झाले होते.

आयसीआयसीआयकडून मिळालेले ३२५० कोटी त्याचाच भाग होता. सीबीआयने ३१ मार्च २०१८ रोजी कोचर पती-पत्नी, धूत व अज्ञातांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली होती. या वादग्रस्त प्रकरणामुळे चंदा कोचर यांना ४ ऑक्टोबर २०१८ रोजी आयसीआयसीआय बँकेचे सीईओ आणि एमडीपद सोडावे लागले होते.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या