फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशप्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार निवडणूक?; कपिल सिब्बलांनी दिले संकेत

प्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार निवडणूक?; कपिल सिब्बलांनी दिले संकेत

वाराणसी : मागील वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या मोठ्या राज्यांमध्ये सत्ता मिळवलेल्या काँग्रेसमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रियंका गांधी यांच्या राजकारणात प्रवेशानंतर काँग्रेसमधील लहान-थोरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहाला शह देण्यासाठीच काँग्रेसने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रियंका आल्यामुळे आता मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर होणार असल्याचे म्हणत या दोन मतदारसंघातून प्रियंका निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिली होती. तोच धागा पकडत आता कपिल सिब्बल यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मोदी आणि शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचे आवाहन केले होते. मात्र, आता प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात दाखल झाल्यामुळे आपल्याला मुक्त वाराणसी?मुक्त गोरखपुर? पहायला मिळेल.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या