नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवून कार्यकत्र्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधी यांची कन्या आणि राहुल गांधी यांची बहीण म्हणून अमेठी व रायबरेली या मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधी यांनी आजवर काँग्रेसचा प्रचार केला आहे. पण आता त्यांना पहिल्यांदाच औपचारिकपणे पक्षात पद देण्यात आले असून उत्तर प्रदेश पूर्व म्हणजेच पूर्वांचलमध्ये त्या काँग्रेसच्या महासचिव असतील. विशेष म्हणजे पूर्वांचलमधून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे देखील निवडून येतात. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्याद्वारे काँग्रेसने थेट मोदी आणि योगी दोघांनाही लक्ष्य केले आहे. पूर्वांचलमधून निवडून येतात मोदी आणि योगी पूर्वांचल भागातच वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
या मतदारसंघातून २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लोकसभेवर निवडून गेले. तर याच भागातील गोरखपूर या लोकसभा मतदारसंघातूनच योगी आदित्यनाथही अनेक वर्ष खासदार होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. पूर्वांचलवर भाजपाचा दबदबा २०१४ मध्ये मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवत विरोधी पक्षांना हादरा दिला होता. तर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तीन दिवस पूर्वांचलमध्ये होते. भाजपाने पूर्वांचलवर जोर दिल्याने लोकसभा निवडणुकीत या भागातील फक्त आझमगडची जागा समाजवादी पक्षाला मिळाली होती. उर्वरित जागांवर भाजपाचे वर्चस्व होते.