फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश२७ सप्टेंबर...

२७ सप्टेंबर…

सेंट्रल नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया(एनएचएआय)चे उप महाप्रबंधक सत्येंद्र दुबे यांना देश अद्याप विसरला नाही.इतकंच की पंतप्रधान कार्यालयाला महामार्गाच्या कामात होणा-या प्रचंड भ्रष्टाचाराबाबत त्यांनी एक गोपनीय पत्र लिहले,त्यात त्यांनी विनंती केली की माझे नाव गुपीत राहू द्या मात्र,असे घडले नाही.पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयींच्या कार्यालयाने ते पत्र त्यांच्या बायोडाटासह एनएचएआय मंत्रालयात पाठवून दिले!हे पत्र तब्बल आठ सनदी अधिका-यांच्या टेबलवरुन फिरले आणि शेवटी  हे पत्र पाठवल्यानंतर २७ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचा निघुर्ण खून झाला!३० सप्टेंबर…हाच तो दिवस जेव्हा इंडियन एक्सप्रेसने ही घटना देशा समोर आणली.
आयअायटी कानपूरचा १९९४ चा एक हूशार सिविल अभियंता ज्यांना बिहारमध्ये नोकरी करताना भ्रष्टाचारावर बोलल्यामुळे आपला जीव गमावावा लागला.आपल्या कुटूंबियांचे भरणपोषण प्रामाणिकपणे करण्याचे व आपल्या देशासाठी चांगलं काम करण्याचं ध्येय या अभियंताने उराशी बाळगलं होतं,मात्र,याच चांगूलपणा आणि प्रामाणिकतेने त्यांचा घात केला.तो काळ बिहारमध्ये लालू-राबडीदेवींच्या कारकीर्दीचा होता.तेथील प्रशासकीय अधिकारी हे गुंड,भ्रष्टाचा-यांच्या सूचनेनुसार काम करीत होेते.अभियंते असो किवा ठेकेदार,रुग्णालय असो किवा शाळा,स्वयंसेवी संस्था असो किवा खासगी कंपनी,कोणीही सत्ताधा-यांद्वारा पाळलेल्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात बोलल्यास त्यांना ‘शिक्षा’मिळत होती.
सत्येंद्र दुबे हे पंतप्रधानांच्या महामार्गाच्या कामात प्रामाणिकपणे काम करीत होते मात्र,त्यांच्या विभागात प्रत्येक स्तरावर त्यांना प्रचंड भ्रष्टाचार होताना दिसत होता.कामाच्या ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेच्या पैशांची लृट माजली होती.दुबे स्वर्णिम चतुर्भुज योजनेच्या औरंगाबाद-बाराहट्टी महामार्गाचे काम बघत होते तो ६० किलोमीटर अंतराचा महामार्ग होता.कोरडमा(झारखंड)मध्ये याचे मुख्यालय होते.या ठिकाणाहून संपूर्ण काम संचालित होत होते.११ नोव्हेंबर २००३ दुबे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात या प्रचंड भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती पुराव्यांसह पाठवली.
राज्यातील लालू सरकारकडून त्यांना न्यायाची कोणतीच आशा नव्हती मात्र,केंद्रातील अटल बिहारी सरकारकडून देखील अक्षम्य अशी चूक झाली होती.त्यांनी ते पत्र महामार्ग मंत्रालयात जसे त्या तसे पाठवून दिले.त्यावेळी या मंत्रालयाचे मंत्री होते बी.सी.खंडूरी.त्यांनी या हत्येनंतर,त्यांना असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा दावा केला.एनएचएआयच्या अध्यक्षांना याविषयी माहिती असेल,असे सांगून आपला पल्ला झाडला.दुबे यांच्या हत्येनंतर त्यांनी फक्त फोनवर बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी व मृतक दुबे यांच्या भावासोबत बोलून कर्तव्याची इतिश्री मानून घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले,की रोज लाखोच्या संख्येने पत्र येतात,त्या सर्वांना ट्रेस करने कठीण आहे मात्र,दुबे यांना हीच भीती होती की त्यांचे पत्र सामान्यांचे पत्र समजून दखल घेतली जाणार नाही म्हणून त्यांनी आपले नाव गोपनीय ठेवले नाही.ते या योजनेशी अतिशय जवळून जुळले होते.या पत्रासोबत त्यांनी संपूर्ण कागदपत्रे जोडले होते.त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात येऊन धडकलेले ते सामान्य पत्र नव्हते.
बाजपेयी यांना पत्र लिहण्या पूर्वी त्यांनी वरिष्ठांच्या कानावर हा भ्रष्टाचार घातला होता.रस्ते बांधताना योग्य अभियांत्रिकी प्रक्रियेचा अवलंब होत नसल्याची तक्रार केली होती.भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली होती.आपलं नाव गुप्त ठेवण्याची विनंती ही त्यांनी पत्रात केली होती मात्र,बाजपेयी यांच्या कार्यालयाने मुद्दामून ते पत्र त्यांच्या बायोडाटासह महामार्ग मंत्रालयात पाठवून दिले….!
दुबे यांच्या हत्येनंतर बिहार राज्याचे तत्कालीन डीजीपी डीपी ओझाने हे स्वीकारले की ठेकेदारीचं गुन्हेगारीकरण हे चूक आहे पण हेच सत्य आहे!त्यांनी हे स्वीकारले की सर्वाधिक ठेके हे माफिया यांना मिळाले आहेत.त्यांनी आश्‍वासन दिले की,एका प्रामाणिक अभियंताला न्याय मिळण्यासाठी ते व्यक्तिगत प्रयत्न करणार!या गुन्ह्यातील आरोपी उदय मल्लाह याला सीबीआयने अटक केली मात्र,घटनेच्या तब्बल सात वर्षांनंतर २०१० मध्ये तो फरार झाला.यानंतर २०१७ मध्ये पुन्हा त्याला अटक झाली.गया रेल्वे स्टेशनजवळ घडलेल्या दुबे हत्याकांडला सीबीआयने देखील ‘लृटीची’घटना मानली!

उदय मल्लाह व त्याच्या चार सहका-यांना लृटीच्या आरोपातच अटक झाली.या सर्वांचे नक्सली कनेक्शन देखील समोर आले होते.या घटनेत मंटू कुमार,उदय मल्लाह आणि पिंटू रविदास यांना दोषी ठरवण्यात आले,हे सर्व कटारी गावांत राहणारे होते.मात्र,दुबे यांच्या भावाने या सर्व कारवाईवर निराशा व्यक्त केली.दुबे यांच्या भावाने आरोप केला होता,की खरे आरोपींना वाचवण्यासाठी या तिघांना आरोपी करण्यात आले.सीबीआयने सांगितले की,अभियंते सत्येंद्र दुबे यांची सर्किट हाऊस समाेर तेव्हा हत्या झाली जेव्हा ते वाराणसीमधून परत आले होते.परत आल्यावर दुबे यांनी बघितले की त्यांना घेण्यासाठी कोणतीही गाडी आली नाही तर त्यांनी ऑटो रिक्क्षा पकडली.त्या वेळी मध्यरात्रीचे ३ वाजले होते.त्यांचा वाहनचालक जेव्हा स्टेशनवर आला तेव्हा त्याला दुबे स्टेशनवर दिसले नाही.यानंतर त्यानेच दुबे यांचे शव रस्त्यावर पडलेले पाहिले!सीबीआयने या घटनेला लृटीची घटना ठरवून तपास सुरु केला.अखेर तीन आरोपींना पकडून कर्तव्याची इतिश्री केली.

आयआयटी कानपूरच्या वेबसाईटवर दुबे यांच्या प्रोफाईलमध्ये नमूद आहे ते एका सामान्य कुटूंबातून आले होे.त्यांचा जन्म बिहारच्या शाहपूर येथे १९७३ साली झाला होता.त्यांनी दहावी व बारावीच्या परिक्षेत टॉप केले होते.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना प्रामाणिकपणेचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले मात्र,राजकारणी,नोकरशाही आणि माफियांच्या रोषाचे ते बळी ठरले. या नंतर देशात काँग्रेसची सत्ता आली…मात्र या देशाचा एक मृत प्रामाणिक अभियंता अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत…!
२०१४ मध्ये मोदी हे देशाचे पंतप्रधान झालेत.त्यांची घोषणा होती ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’पण….!
१० जुलै २०२१ रोजी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीसर्च’चा एक अहवाल प्रसिद्ध झाला…पंतप्रधान मोदींच्या ७८ पैकी ४२ टक्के मंत्र्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल होते.मंत्रीमंडळातील ९० टक्के म्हणजजे ७० मंत्री हे कोट्याधीश होते.एकूण मंत्र्यांपैकी ३३ जणांनी(४२ टक्के)यांनी त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात त्यांच्यावर गुन्हे असल्याची बाब नमूद केली आहे.यातील २४ मंत्र्यांवर खून,खूनाचा प्रयत्न,दराेडा आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेेत!
स्वत: गृहमंत्री राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांच्यावर खूनाचा गुन्हा(भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये)दाखल होता.ते मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होते.
एस.मंजुनाथ हे आयआयएम लखनऊ येथील पदवीधर असून इंडियन ऑईलमध्ये सेल्स मॅनेजर होते.१९ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांची हत्या झाली.इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपचे मालक यांना अनेकदा त्यांनी पेट्रोलमध्ये भेसळ करण्यास रोखले होते.हत्या झाली त्या दिवशी देखील ते नमूना घेण्यासाठी त्याच्या पेट्रोल पंपावर आले असता त्यांना गोळी मारण्यात आली.त्यांचा शव सीतापूर जिल्ह्यात आढळला.
गेल्या वर्षी २५ जानेवरी रोजी नासिक जिल्ह्याच्या मनमाड जवळ एडीएम यशवंत सोनावणे यांना तेलातील भेसळीची चाचणी करीत असताना काही लोकांनी जाळून मारले.यावेळी आगीमध्ये होरपळून जखमी झालेला प्रमुख आरोपी पोपट शिंदे याचा देखील मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमध्ये साढे आठ हजार कोटींच्या आरोग्य मिशन घोटाळ्याशी जुळलेल्या ९ लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला.मेडीकल अँड हेल्थचे डीजी डॉ.बच्चीलाल रावत यांनी ड्रग माफियाची मदत करण्यास नकार दिल्याने गोळी मारुन हत्या करण्यात आली.माफियाला औषधाचा ठेका देण्यास नकार दिल्याने इठावाचे सीएमओ डॉ.आेमप्रकाश चिंपा यांना त्यांच्या घरा बाहेर गोळी मारुन हत्या करण्यात आली.
डिप्टी सीएमओ डॉ.शैलेष यादव हे सीबीआय समोर खुलासा करणार होते त्या पूर्वीच त्यांच्या कारवर ट्रॉली चढली आणि….त्यांचा मृत्यू झाला.डॉ.बी पी सिंह,एनआरएचएम सीएमओ,एप्रिल २०११ रोजी मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि..त्यांची हत्या झाली.विभागातील फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी पकडला होता.डॉ.योगेंद्र सचान,डिप्टी सीएमओ,जून २०११ रोजी लखनऊच्या कारागृहात फाशीच्या फंद्यात लटकलेले मिळाले.शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर गंभीर जमखा आढळल्या.त्यांच्यावर डॉ.बी पी सिंह व आर्य याच्या हत्येचा आरोप होता व तो चौकशीमध्ये अनेक मोठी नावे सांगणार होता.प्रकल्प व्यवस्थापक सुनील वर्मा,याची जानेवरी २०१२ रोजी गोळी मारुन हत्या करण्यात आली.ते देखील मोठ्या नावांचा खुलासा करणार होता.
ही नावे आहेत मध्यप्रदेशच्या ‘व्यापम’घोटाळ्यातील…जेथील ‘लाडली बहनांनी’यंदा ही  लोकसभेच्या संपूर्ण २९ लोकसभेच्या जागा भाजपच्या झोळीत घातल्या….!
शायर मुज्जफर वारसी सांगतो ‘औरो के ख्यालयात की लेते है तलाशी
और अपने गरेबान मे झाँका नही जाता…..’
दिवंगत सत्येंद्र दुबे यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.
………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या