पत्र परिषदेत केसीआरची स्पष्टोक्ती
नागपूर,ता.१५ जून २०२३: आज सुरेश भट सभागृहात आपल्या संपूर्ण दीड तासांच्या भाषणात एकदाही वेगळ्या विदर्भाविषयी उल्लेख केला नाही,आपल्या पत्र परिषदेत देखील वेगळ्या विदर्भा ऐवजी तेलांगणाचे मॉडेल विदर्भात राबविल्यास विदर्भाचे प्रश्न सुटतील असा उल्लेख केला,यावर भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडून दिला आहे का?असा प्रश्न विचारला असता यावर बोलताना ‘मी विदर्भ धरलं ही नाही व सोडलं ही नाही’असे उत्तर त्यांनी दिले.ते आज सायंकाळी वर्धा रोडवरील हॉटेल रेडीसन ब्ल्यूमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारतात अनेक नवीन राज्यांची सातत्याने मागणी होत आहे.बिहारच्या मिथिलांचलची मागणी ही आमच्या सोबतची होती,तेलंगणा बनले मात्र त्यांची मागणी आहे तशीच आहे,तीच बाब विदर्भाची देखील आहे,केंद्र सरकारने लहान राज्यांविषयीचा विचार केला पाहिजे.तेलंगणा निर्मित झाल्यानंतर ३३ जिल्हे निर्मित करुन एका ऐवजी तीन-तीन जिल्हाधिकारी नियुक्त केले तर आंध्र प्रदेशने २५ जिल्ह्यांची निर्मिती केली.देशात दहा-पंधरा राज्य बनले तरी काय फरक पडतो?असे सांगून, पूर्वीच्या लहान राज्येच विकास घडवू शकतात व विदर्भावरील अन्याय दूर होण्यासाठी पृथक विदर्भ झालाच पाहिजे या आपल्या भूमिकेवरुन त्यांनी आज सपशेल घूमजाव केल्याचे निर्दशनास आले
तेलंगणाची निर्मितीनंतर त्यांनी विदर्भाच्या मागणीकडे दूर्लक्ष केले,यावर विचारले असता,‘भारत मे राज्य बनाने के लिये अजीब स्थिती है’ असे सांगून, मलाही पृथक तेलंगणा बनविण्यासाठी १५ वर्ष संघर्ष करावा लागला असे ते म्हणाले.मरणांतिक उपोषण करावे लागले.मरता मरता वाचलो तेव्हा कुठे केंद्राने मागणी मंजूर केली.उच्च गुणवत्ता व परिवर्तनासाठी पृथक लहान राज्ये असायला हवी,असे समर्थन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील २८८ जागांवर बीआरएस उमेदवार उभे करणार याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षालाच फायदा पोहोचवण्यासारखे नाही का?या प्रश्नावर बोलताना,कोणाचा फायदा कोणाचे नुकसान याच्याशी आम्हाला काहीही घेणे देणे नसल्याचे ते म्हणाले.बी टिम,सी टिम या आरोपां पलीकडे बीआरएसचं काम देशातील जनतेसाठीच असणार असल्याचे ते म्हणाले.
तेलंगणा व्यतिरिक्त पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रच का निवडले?यावर बोलताना,महाराष्ट्रात सर्वाधिक दुखद परिस्थिती आहे.सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या महाराष्ट्र राज्यात घडल्या.तेलंगणाला लागून असलेल्या यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी कूप्रसिद्ध झाला आहे.यासाठीच महाराष्ट्रापासून पक्ष वाढीला सुरवात केली असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा समान नागरिक कायदा आणण्याच्या तयारीत आहे,तुमची यावर काय भूमिका असणार?यावर बोलताना,जेव्हा आणतील तेव्हा बघू,असे सांगून त्यांनी प्रश्न टाळला.धर्मगुरुंच्या प्रश्नावर देखील धर्मगुरुंनी मठात राहवे राजकारणात त्यांचे काय काम?असे उपरोधिक उत्तर त्यांनी दिले.एका प्रश्नावर बोलताना,ज्ञान का कोई ठेकेदार नही,अच्छा ज्ञान किसी भी राज्य का हो,लेना चाहीये,पायाभूत सुविधा ही महत्वाची असते.आज जगातील मलेशिया पासून अनेक देश हे बघता-बघता भारतापेक्षाही पुढे निघून गेलेत,असे मत त्यांनी व्यक्त केले.
केसीआर यांच्या महाराष्ट्रातील आगमनानिमित्त वृत्तपत्रातील जाहीरातीमध्ये, तेलंगणाचा पॅटर्न केंद्र सरकार देशात राबविते,अश्या आशयाची जाहीरात असते,याविषयी छेडले असता,मोदी माझे चांगले मित्र आहे,विचारांची अदलाबदल घडत असते असे सांगून त्यांनी प्रश्न टोलवला.
विदर्भात बीआरएसला किती जागा मिळतील?यावर बोलताना,सगळ्या जागा आम्ही जिंकू,असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.तुमचे सरकार देशात आले तर शिक्षण आणि रोजगार नीतीमध्ये बदल करतील का?या प्रश्नावर बोलताना,राजकीय पक्ष हे निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही देखील तो प्रसिद्ध केला.राज्यातील ११९ पैकी पहील्या निवडणूकीत आम्हाला ६३ तर दुस-यांदा ८८ जागा मिळाल्या.याचा अर्थ आमचा जाहीरनामा तेलंगणाच्या जनतेच्या पसंतीस उतरला आहे.आम्ही जे वचन जाहीरनाम्यात दिले त्याची १०० टक्के पूर्तता केली.आज ही दलित वर्गावर या देशात अनेक ठिकाणी अन्याय होतो.तो घोडीवर बसला तर त्याच्यावर दगडफेक केली जाते.ही परिस्थिती बदलली पाहिजे.दलितांचा आर्थिक विकासच त्यांचा उद्धार करु शकतो.आमच्या सरकारने ‘दलित बंधू योजनेद्वारे’दहा लाख रुपये कोणत्याही पाबंदीशिवाय रोजगारासाठी ५० हजार कुटूंबाला दिले.ज्याच्यात हो हूनर होता तो व्यवसाय त्यांनी सुरु केला.याचा राज्याला देखील आर्थिक फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.या ही वेळी दलित बंधू योजनेत १७ हजार कोटी अर्थसंकल्पात ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय आम्ही ‘आवासी शिक्षण योजना’राबविली.एका वर्षात १ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.देभभरात शिक्षण हे मोफतच मिळायला पाहिजे.सरकारी शाळेचा स्तर हा उंचावला पाहीजे.सरकारी शाळा स्पर्धात्मक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रिय एजेंसींच्या दुरुपयोग यावर प्रश्न विचारला असता,हे फार चुकीचं घडत असल्याचे ते म्हणाले.लोकतंत्रमध्ये हे योग्य नाही.राजकीय पक्ष हे लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ असतात.राजकीय पक्ष वाचतील तर लोकशाही वाचेल.स्वत:मोदी हे एका राजकीय पक्षामुळेच त्या पदापर्यंत पोहोचू शकले.असे असताना केंद्रिय एजेंसीचा दुरुपयोग होणे ही निंदनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
एका प्रश्नावर बोलताना,खासगी पूंजीपती हे माझ्याही मागे पडले होते मात्र अांधळेपणाने खासगीकरण हे योग्य नाही.त्यामुळेच तेलांगणामध्ये वीज ही आज ही सरकारी आहे.तेलंगणा जनकोद्वारे घरोघरी वीज दिली जाते.ईव्हीएमविषयी छेडले असता,लोगो को शक है तो फिर से बॅलेट पेपरवर चूनाव होने चाहीये,असे उत्तर त्यांनी दिले.पाश्चिमात्य देशांनी कधीचेच ईव्हीएम बंद करुन पुन्हा ते बॅलेट पेपरवर निवडणूका घेत असल्याचे ते सांगतात.
तेलंगणामध्ये मोफत वीज,पाणी अश्यासारख्या योजनांसाठी निधी कसा उपलब्ध करता?या विषयी विचारले असता योग्य निर्णयातून करुन दाखवले,असे उत्तर त्यांनी दिले.भाजपचे २५ अामदार बीआरएसच्या संपर्कात आहेत का?यावर बोलताना,बकवास है,असे उत्तर त्यांनी दिले.महाराष्ट्रात युती करणार का?यावर बोलताना, आम्हाला युतीची गरज पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र,जे आमच्या अजेंडाशी सहमत आहेत त्यांना आवाहन करु,त्यांना साेबत घेऊ असे उत्तर त्यांनी दिले.
संसदेपासून तर राज्यांमधील विधान सभा या संविधानाने नेमून दिलेल्या दिवसांपुरती का पार पडत नाही?यावर बोलताना,आज देशात ‘ब्लेम गेम‘सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.एखादे विधेयक लोकसभेत पारित होतं मात्र राज्यसभेत अडकविल्या जातं.सरकार सांगायला मोकळी की आम्ही तर पारित केलं होतं.जीएसटीचंच उदाहरण घ्या.माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी जीएसटीचे विधेयक संसदेत आणताच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी थयथयाट केला होता.त्यावेळी चिदंबरम जीएसटीचे महत्व देशाला पटवून सांगत होते.मोदी यांनी आता देशात जीएसटी लागू केल्यावर चिंदबरम याला विरोध करीत आहे.खासगीत एकदा मी त्यांना विचारलेही,तुम्ही तर हावर्ड विद्यापीठातून शिकून आले आहात,जीएसटीचे विधेयक तर तुम्हीच आणले,तुम्हाला याचे महत्व माहीतच असेल,यावर बोलताना ते म्हणाले,यालच राजकारण म्हणतात!आपल्याला राजकारणा ऐवजी देशातील जनतेसोबत उघडपणे बोलता आलं पाहिजे,असे केसीआर यांनी सांगितले.
‘लव्ह जिहाद’विषयी त्यांची काय भूमिका आहे?असा प्रश्न विचारला असता,आज देशात लोकसंख्येच्या समप्रमाणात महिलांची संख्या असल्याचे ते म्हणाले.आमची सरकार देशात आल्यावर आम्ही एका वर्षाच्या आत संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊ कारण देशातील महिलांच्या सहभागितेतूनच देशाची प्रगती घडू शकते,असे सांगून त्यांनी लव्ह जिहादचा विषयच टाळला.
याप्रसंगी त्यांनी पत्रकारांसमोर बीआरएसची धोरणे,शेतक-यांना मोफत पाणी,वीज,पाणी व वीजेची देशातील उपलब्धता,गरज,मेक इन इंडियाचे धोरण,आयात-निर्यातीतील तफावत,इतर देशांच्या प्रगतीसोबत भारताची केलेली तुलना,अन्नधान्याचे उत्पादन इत्यादी विषयी माहिती देत आम्हाला टाईम लाईन नाही,हा खूप लांब पथ आहे मात्र परिवर्तन घडेल हे निश्चित असे सांगून आम्हाला कोणतीही घाई नसल्याचे ते म्हणाले.भारत पण बदलेल,वेळ लागेल पण जोपर्यत परिवर्तन होणार नाही आम्ही प्रयत्न सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
……….