फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश'द केरल स्टोरी'...वास्तवतेचा अंतर्वेध

‘द केरल स्टोरी’…वास्तवतेचा अंतर्वेध

डॉ.ममता खांडेकर

(Senior Journalist)

जगाचा इतिहास चाळून बघितल्यास पहील्या महायुद्धाच्या महाभंयकर क्रोर्याचा इतिहास आपल्या हाती लागतो.चीन देशाची राजधानी नानकिंग मध्ये झालेले अत्याचार म्हणजे क्रोर्याचा कळस होते.जपानी सैनिकांसह कोणीही युद्ध काळात स्त्रियांवर लैंगिक हल्ला करीत असत,मग ती गरोदर असो किवा विवाहीत.या घटना माणसांनी आपल्या अंत्यंत घृणास्पद गोष्टीचं किवा अविष्काराचं अंतिम टोक गाठणा-या होत्या.बलात्कारानंतर स्त्रियांच्या योनीत लोखंडी कांबी,बंदूक किवा फूटलेल्या बाटल्या खूपसणं,छळ करुन तिला मारुन टाकणं या सगळ्याला नाव दिलं गेलं ‘नानकिंग बलात्कार’.जॉन मॅगीचा अमेरिकन मिशनरीनं काढलेले फोटो आणि तयार केलेली १६ एम.एम.चा चित्रपट म्हणजे ‘नानकिंग बलात्कार’.

सध्या भारतात अशाच स्वरुपाच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत राजकीय धुराळा उडाला आहे तो म्हणजे ‘द केरल स्टोरी’.सत्ताकारणापासून तर अर्थकारणापर्यंत जाताना मध्ये ‘धर्मकारणाचे’प्रतिबिंब जरी या कलाकृतीत निर्माते विपुल शहा यांनी उमटवले असले तरी मध्यवर्ती कथानक ही एकमेव ‘स्त्री’च ठरते.स्त्री ही कोणत्याही धर्माची,जातीची,पंथाची,प्रांताची असो तिच्यावर जगाच्या कानाकोप-यात बलात्कार घडत असतात,त्याची मग बातमी बनते तर कधीकधी चित्रपटही निर्मित होतात.

‘द केरल स्टोरी’ही अशाच हिंदू व ईसाई मुलींचे केरलच्या एका प्रसिद्ध नर्सिंग हॉस्टेलमध्ये] हे मानवतावादी,सेवाभावी शिक्षण शिकत असताना करण्यात आलेले धर्मांतरण,मानवी जगाच्या भूमीवरील वर्तुळात असलेले सिरीया, अफगानिस्तान या देशात फूस लाऊन नेण्यात आलेल्या हिंदू व ईसाई तरुणी,त्यांचा सोबत इसिसच्या(आयएसआयएस) छळ छावण्यांमध्ये करण्यात आलेले क्रोर्य,ओठांवर फक्त लिपिस्टीक लावल्यामुळे तिचा कापण्यात आलेला हात व पतीचे धड वेगळे करने,बाजार हाट करण्यासाठी घरातील कोणाताही पुरुष सोबत न घेतल्यामुळे त्यांचा बंदूकीच्या गोळ्यांनी चाळण करण्यात आलेला देह,हे सर्व ‘सभ्य’समजल्या जाणा-या माणसांच्या अंगावर काटा उभा करणारे आहेत.

या चित्रपटाची नायिका ही राष्ट्र संघाच्या संयुक्त शांति दलाच्या हाती अतिरेकी म्हणून सापडते व आजही ती तेथील तुरुंगात असल्याचा दावा हा चित्रपट करतो.चित्रपटाच्या शेवटी ज्या तीन मुलींवर हे कथानक निर्मित झाले त्या तिन्ही मुलींचे पालक ऑन स्क्रीन प्रेक्षकांना व्यथा मांडताना दिसतात आणि….सुन्न होऊन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडताना आढळतो.

केरळ….निसर्गाने नटलेले हे भारतातील अनोखे राज्य.देशातील सर्वाधिक साक्षर प्रदेश.या राज्यात कम्यूनिस्टांचे शासन प्रदीर्घकाळापासून असून ,कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानातच ‘धर्म म्हणजे अफूची गोळी’असल्याचे सांगितल्याने, या राज्यातील सत्ताधा-यांनी देखील मतांच्या लांगून चालनातून राज्यात फोफावलेल्या कट्टर धार्मिकतेकडे,त्यातून घडणा-या धर्मांतरणाकडे हेतूपुरस्सर पार दूर्लक्ष केल्याचे हा चित्रपट सूचवतो.

या चित्रपटातील एक पात्र असणारी युवती पश्‍चाताप दग्ध होऊन आपल्या कुटूंबात परत येते तेव्हा आपल्या वडीलांच्या मांडीवर डोकं ठेऊन खंत व्यक्त करते की त्यांनी तिला जगभरातील तत्वज्ञानाचे धडे शिकवले मात्र आपल्या भारत देशातील तत्वज्ञान आणि धर्माची ओळख कधीही करुन दिली नाही…..!

सिरीयाला जाण्यास नकार दिल्यामुळे ‘तो ’तिचे सर्व न्यूड फोटोज आणि व्हिडीयोज व्हायरल करतो,ती आत्महत्या करते,तिच्या आईवडीलांचे रहाते घर ही पेटवून दिल्या जातं….!

फातिमा बा चे चारित्र्य साकारणारी उम्दा अभिनेत्री अदा शर्मा तसेच केरळमधील अनेक बेपत्ता झालेल्या तरुणी या कश्‍याप्रकारे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून सिरीयासारख्या कट्टर धार्मिक आतंकवाद्यांच्या देशात पोहोचतात व तिथे त्यांच्यासोबत काय-काय घडतं हे या चित्रपटाचं मूख्य कनाथक आहे.अर्थातच राजकारणाच्या भट्टीत भारतात, जो तो यात आपलेही हात शेकत आहेत.पं.बंगाल,तमिळनाडूत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली तर उत्तरप्रदेश,मध्यप्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला.

या चित्रपटाच्या प्रदर्शनालाच स्थगिती द्यावी म्हणून उच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली मात्र,४ मे २०२३ रोजी उच्च न्यायालयाने या मागणीस नकार दिला.केरळमधील ३२ हजार महिला या धर्मांतरित होऊन इसिसच्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्यात आल्याचे या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखविण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.या चित्रपटाला केंद्रिय चित्रपट प्रमाणन मंडळाने(सीबीएफसी)चित्रपटाचे परिक्षण करुन तो सार्वजनिक प्रदर्शनासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.एवढंच नव्हे तर कनार्टक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपटाचा उल्लेख अवार्जून केला,हे विशेष.

चित्रपटात कितपत सत्यता आहे किवा ,भाजप तसेच विरोधी पक्षांचे सरकार या चित्रपटाविषयी कोणते राजकारण करतात,या पलीकडे या चित्रपटात एकमेव वास्तवतेच अंतर्वेध गवसतो तो म्हणजे धार्मिक,वांशिक किवा राजकीय युद्धाच्या काळात भरडली जाते ती फक्त स्त्रीच.माणूस म्हणून तिचा कोणताही विचार न करतात अतिशय पाशवीरित्या तिच्यावर अत्याचार केला जातो.

आपले पुरुषत्व बलात्काराच्या स्वरुपात प्रदर्शित करता येतं आणि त्यामुळे स्त्रियांच्या मनात .भीती उत्पन्न होते,हा पुरुषाला लागलेला ‘शोध’ अग्नी आणि अश्‍मयुगातील पहिल्या ओबडधोबड दगडी हत्याराच्या शोधा इतकाच त्यामुळेच महत्वाचा ठरतो,असे अमेरिकन अभ्यासक ब्राऊन सिलर म्हणतो.

मूळात का केले जातात स्त्रियांवर बलात्कार?समस्त स्त्रियांच्या मनात दहशत निर्माण करणारे पुरुषी ‘हत्यार ’म्हणजे बलात्कारच असतो.या पुरुषी दहशतीमागे अनेक सामाजिक,धार्मिक,वांशिक,राजकीय संदर्भ दडलेले असतात.संपूर्ण जगात हीच स्थिती आहे,भारत हा देश ही या मानसिकतेला अपवाद नाही.श्रेष्ठत्वाच्या अंहकारातून अनेक दलित स्त्रियांच्या देहाचे लचके तोडणारे व त्यांचे देह झाडावर लटकवून संपूर्ण गावात दहशत निर्माण करणारे आज ही हिंदी भाषिक राज्यात असो किवा महाराष्ट्रातील कोणत्या तरी गावात आढळतात.टोळीवाद,गणवाद,जातवाद,धर्मवाद,देशवाद,चंगळवाद मूलतत्ववाद,दहशतवाद,पुरुषसत्ताकता असो किवा बाजारपेठेचे वर्चस्ववाद,जगभराची युद्धखोरी व शस्त्रांची निर्मिती हे सगळे बलात्कारासाठी पोषक भूमि निर्मित करीत असते.

हे अनेक देशातील इतिहासावरुन सिद्ध झालं.भारतातही दर अर्ध्या तासाला एक बलात्कार देशाच्या कोणत्या तरी कानाकोप-यात घडत असतो.आंध्रप्रदेशचे एक आमदार तर ’आमच्याकडे बलात्काराची राजरोस मुभाच उपलब्ध असल्याची वल्गना करताना आढळले,त्यांचा इशारा जोगिणी किवा देवदासी प्रथेकडे होता.याच राज्याच्या विधानसभेत एका सदस्याने एका प्रश्‍नावर बोलताना ‘स्त्रीला जर बलात्काराचा प्रतिकार करता आला नाही तर किमान तिने त्याचा आनंद घ्यावा’अशी मुक्ताफळे उधळली,दूर्देवाने त्यांच्या या उक्तीवर विधान सभा अध्यक्ष यांनी देखील आपले दांत दाखवून सभागृहात फूललेल्या हास्यात साथ दिली,विधान सभेसारख्या सभागृहात स्त्रीविषयीचे असे उद् गार एक आमदारच काढत असेल वर त्याच्यावर कारवाई करण्या ऐवजी हसून त्याला दाद देण्याचे कृकृत्य विधान सभा अध्यक्षच देत असतील तर स्त्रीच्या अस्तिमेचा,आत्मसन्मानाचा विचार आणखी कुठे होऊ शकेल?

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा दिवंगत मुलायम सिंग यांनी तर एका निवडणूकीत मतांच्या लांगूनचालनातून ते सत्तेत आले तर उत्तर प्रदेशातील तरुणांवरील बलात्कारांचे गुन्हे तपासून बघितले जाईल असे भयंकर विधान करुन ‘बच्चे है नादानी में गलती हो जाती है,इसका मतलब ये नही जिंदगी भर वो जेल मे सडते रहे’असे उद् गार उधळले होते.हे शब्द नसून राजकारण्याची मानसिकता काय असू शकते व राजकारणाची दिशा कितपत खालचे स्तर गाठू शकते,याचे निर्देशांक म्हणून सांगता येईल..

केरळचीच नलिनी जमिला हिचे ‘सेक्स वर्कर’हे आत्मचरित्र पुरुषी अहंकाराचे सर्व रेकॉर्ड तोडणारे पुस्तक ठरले आहे.आशियातील भारत या देशातील एका राज्यात स्त्रीयांवर होणा-या अत्याचारांच्या श्रृखंला येथेच थांबत नाही तर,अफिक्रेतील खांडा या देशात तर १० वर्षाच्या मुलीपासून तर ७० वर्षाच्या वयोवृद्ध म्हातारीपर्यत सर्वांवर ६ एप्रिल १९९४ ते जुलै १९९४ दरम्यान म्हणजे तब्बल १०० दिवस अत्याचार करण्यात आले.हूतू जमातीच्या लोकांनी तुत्सी माणसांचा संहार केला होता या युद्धात.१०० दिवस हे वंशविच्छेदन…. हे क्रोर्य चालले होते.८,००,००० तुत्सी माणसांचा संहार आणि ५,००,००० मुली व स्त्रियांवर बलात्कार घडला होता….!

बलात्कार होतात म्हणून जगात वांशिक दंगली होत नाहीत तर वांशिक दंगलींचा तो एक अटळ अविष्कार आहे,असं एक भारतीय लेखिका लिहून ठेवते….!

दुस-या महायुद्धात साम्राज्य विस्ताराच कैफ चढलेल्या जापानला लष्करी धोरण म्हणून त्यांच्या सैनिकांसाठी,लैंगिक सुख पुरवणारी ‘आराम केंद्रे‘सुरु करण्यात आली होती.यात चीन,कोरिया,फिलीपाईन्स,थायलंड,मलेशिया,तैवान,इंडोनैशिया या देशातून पकडून आणलेल्या स्त्रियां होत्या….!युद्धानंतर या स्त्रियांना या केंद्रातून हूसकावून लावण्यात आले.त्यांची कोणीच जवाबदारी घेतली नाही.कित्येक मुलांना ठार मारण्यात आले.युद्ध गुन्ह्यांमध्येही या प्रकरणाची नोंद झाली नाही,५० हजार पासून तर अडीच लाख स्त्रियांचा प्रश्‍न यात गुंतला होता,पण……?

आयसीसच्या युद्धखोरांनी भारताच्या केरळमधील हिंदू व इसाई धर्माच्या स्त्रियांचा उपभोग सिरीयामधील छळछावणीत घेतला,एवढंच ‘द केरळ स्टोरी’अधोरेखित करतो मात्र हे हिमनगाचे फक्त एक टोक आहे.चित्रपटातील एकूण १० दृष्यांवर सेंसर बोर्डाची कात्री लागली यावरुन यात काय होतं,याचा अंदाज येतो….!

एकूणच काय?तर केरळ स्टोरीसारखंच किवा त्यापेक्षाही भयंकर जगाच्या कानाकोप-यात सतत कुठेतरी घडत आलं आहे,घडत असंत,घडत राहील,सध्या रशिया-युक्रेनच्या युद्धात तेथील स्त्रियांची काय दशा आहे?याचा अंदाज लावणे कठीण नाही.

थोडक्यात, मानवी समाज,विशेषत:स्त्री-पुरुष संबधाचं पर्व अतिशय लज्जास्पद स्थितीत पोहोचलं आहे.हजारो वर्ष पुरुषांनी स्त्रियांवर लैंगिक नियंत्रणासाठी सत्ता गाजवली,आजच्या आधुनिक युगातही यात यतकिंचितही बदल झाला नाही,हा चित्रपट हिंदू-मुस्लिम पलीकडे हे अधोरेखित करतो मात्र, हा मानवी मुद्दा सत्ताकारण आणि राजकारणासाठी सोयीचा नसल्यानेच याची ‘जाहीर’वाच्यता होत नाही.पुरुषी वर्चस्ववाद आणि लष्करी दमन यंत्रणा यासोबतच सर्वसाधारण हितसंबधांची यंत्रणा एकमेकांना पूरकरितीने गळ्यात गळे घालून चालत आहे..कित्येक युग..अशीच चालत राहणार…२९ मे २००९….काश्‍मीरची शोपियां ही नणद आणि निलोफर या भावजीवर सुरक्षा दलाच्या कॅम्पजवळ बलात्कार करुन मारुन टाकण्यात आलं….!

यावर नाही निघणार का एखादा ‘काश्‍मीर फाईल्स!’
………

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या