फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशसितारे जमी पर: उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस प्रवेश

सितारे जमी पर: उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षांतर आणि पक्षप्रवेशाचे सोहळे रंगताना दिसत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत संपली आहे. परंतु, निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतील मतदानासाठी अजुनही पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्यात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव जोडले गेले आहे. उर्मिलाने काँग्रेसमध्येप्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सामान्यपणे लोकांचा हा समज असतो सिने अभनेते,अभिनेत्री ग्लॅमरमुळे गर्दी खेचू शकतात मात्र मी निवडणूक बघून काँग्रेस प्रवेश घेतला नाही तर निवडणुका नंतर पक्ष ही सोडणार नाही याचे कारण मी अगदी सुरवाती पासून काँग्रेस पक्षाच्या तत्वज्ञानात विश्वास करते माध्यमांशी बोलताना असा खुलासा तिने केला.

राजकारण आणि सिने कलाकारांचा संबंध बऱ्याच वर्षांपासून चालत आला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. यापैकी अनेकांनी बॉलिवूडसोडल्यानंतर अखेरच्या श्वासपर्यंत राजकारण सोडले नाही. तर अनेक कलाकार असे आहेत, ज्यांचे मन राजकारणात अधिक काळ रमले नाही. यामध्ये सर्वप्रथम नाव येते गोविंदाचे. अभिनेता गोविंदा याने त्याकाळी भाजपचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा उत्तर मुंबईतून पराभव करत विजयाची नोंद केली होती. मात्र गोविंदाची राजकीय कारकिर्द फारशी बहरली नाही. याउलट संसदेत गैरहजर राहण्यावरूनच त्याच्यावर टीका झाली. उर्मिलाच्या बाबतीत ही असंच होईल का, उर्मिला राजकारणाला पूर्ण वेळ देईल का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. उर्मिलाने आपल्या अभिनयाने बराच काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. तन्हा तन्हा यहा पे जीना ये कोई बात है….म्हणणारी उर्मिला आता आपल्या राजकीय इनिंगसाठी सज्ज झाली आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या