फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशअंतराळात भारताची ऐतिहासिक कामगिरी: तीन मिनिटात नष्ट केले अँटी सेटेलाईट

अंतराळात भारताची ऐतिहासिक कामगिरी: तीन मिनिटात नष्ट केले अँटी सेटेलाईट

नागपूर: दिनांक २७ मार्च रोजी दूपारी भारताच्या अंतराळ वैज्ञानिक संशोधनाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. देशातच निर्मित भारतीय बनावटीच्या मिसाईलने अंतराळस्थित ‘अँटी मिसाईल’ ला फक्त तीन मिनिटात नष्ट केले. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत ही कामगिरी पार पाडण्यात आली.
ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना दिली. आजचा दिवस हा भारतासाठी ऐतिहासिक ठरल्याचे त्यांनी सांगितले. जगात फक्त अमेरिका,रुस व चीननंतर भारत हा आता अशी उल्लेखनीय कामगिरी बजावणारा चौथा देश बनला आहे. लियो सेटेलाईट आर्बिटमधील लाईव्ह सेटेलाईटला फक्त तीन मिनिटात नष्ट करण्यात आले. भारताच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल शेजारच्या शत्रू राष्ट्रांना धडकी भरली आहे.अंतराळात भारताने जरी आपली मारक क्ष् मता सिद्ध केली असली तरी भारत हा शांतिप्रिय देश असून शस्त्रांच्या स्पर्धेत भारत शामिल नसल्याचे पंतप्रधान यांनी स्पष्ट केले. शक्तीशाली व सुरक्ष्ति भारत हाच नवीन भारताचा उद्देश्‍य असल्याचे मोदी यांनी सांगितले. देशासाठी आज अत्यंत गौरवशाली दिवस असल्याचे ते म्हणाले. भारताचे हे पाऊल म्हणजे भारत विश्‍वगुरु बनण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे.

वैज्ञानिक संशोधकांनी केले अभिनंदन
भारताच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल देशभरातील वैज्ञानिक संशोधकांनी पंतप्रधान यांचे अभिनंदन केले. टार्गेटवर अचूक मारा करणे व सफलता प्राप्त करणे हे अतिशय अवघड असल्याचे संशोधकांनी सांगितले. यासाठी अचूक गणितीय मोजमाप असावे लागते जे अतिशय क्लिष्ट असते. देशाच्या पंतप्रधानांनी आज आमची पाठ थोपटली या कामगिरीचे कितीही कौतूक केले जरी कमी आहे असे देशभरातील अनेक संशोधकांनी प्रसार-प्रचार माध्यमांवर आपले मत व्यक्त केले.

काँग्रेसचे ट्वीट-नेहरुने सुरु केले होते मिशन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पूर्ण होण्याच्या आधीच काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवर माजी पंतप्रधान पंडीत नेहरु यांच्याच कार्यकाळत ही कामगिरी सुरु झाली असल्याचे ट्वीट झळकले! यावर आता काँग्रेस पक्ष् अंतराळात नष्ट करण्यात आलेल्या ऐंटी सेटेलाईटचेही पुरावे मागणार असल्याची नेटकरींमध्ये चर्चा झळकली. रविशंकरप्रसाद यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे हे यश असल्याचे सांगितले. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो त्यांच्या मार्गदर्शनात मला देशासाठी काम करायला मिळाले असल्याचे ते म्हणाले. हा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. भारत आज जगात शक्तीशाली ताकद म्हणून समोर येत आहे असल्याचे ते म्हणाले. मिशनशक्तीचे यश हे ऐतिहासिक क्ष् ण असल्याचे हषवर्धन राठोड यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या