फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजन'श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।'

‘श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।’

 खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आज पासून ‘जागर भक्तीचा’; हजारोंनी केले हनुमान चालिसाचे पठण 
नागपूर: “श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।” या हनुमान चालिसामधील श्लोकांनी ईश्वर देशमुख महाविद्यालायचा परिसर निनादला. शनिवारपासून सकाळच्या सत्रात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने अबालवृद्धनी हजेरी लावून  भक्तिमय वातावरणात पठणात ते सहभागी झाले.
यावेळी मुख्य अतिथि म्हणून विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री मिलिंद परांडे, विश्व हिंदू परिषद नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे, प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख आणि संस्कार भारतीच्या प्रमुख कांचनताई गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिलिंद परांडे म्हणाले की ‘जागर भक्तीचा’ हा कौतुकास्पद उपक्रम आहे. भगवान हनुमान भक्ती आणि शक्ती सामर्थ्याची देवता आहे.  हनुमान चालिसामध्ये काही ओळी येतात ‘कुमती निवार सुमती के संगी’ म्हणजे दुर्बुद्धी दूर करून सद्बुद्धी वाढवली पाहिजे. सद्बुद्धी असलेल्या लोकांना एकत्रही केलं पाहिजे. समाजातली ही सज्जनशक्ती एकत्र आली की देशकार्य अधिक प्रभावीपणे करता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तत्पूर्वी, सुरुवातीला सहजयोग संस्थेतर्फे योगाभ्यास घेण्यात आला. आपल्या शरीराच्या आत असलेल्या सातही केंद्रांमधली ऊर्जा आपल्यात प्रवाहित व्हायला लागली तर आपल्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये आणि टाळूमधून थंडचैतन्य लहरी व्हायला लागतात असे सांगून योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात योगाभ्यास आणि ध्यानाची छोटी प्रात्यक्षिके करण्यात आली.
शेवटी ‘हनुमानजी की आरती’ करण्यात आली. जागर भक्तीचाचे संयोजक डॉ. श्रीरंग वऱ्हाडपांडे आणि विजय फडणवीस तसेच हनुमान चालीसा संयोजक खेमराज दमाहे, आयोजन समिती सदस्य जयप्रकाश गुप्ता, प्रा. राजेश बागडी, अविनाश घुशे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
भक्तिमय वातावरणात रामरक्षा आणि मारूती स्तोत्राचे पठण 

खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ दुसरा दिवस 
 
हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत भक्तांची लक्षणीय उपस्थिती 
नागपूर: हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत आणि भक्तांच्या लक्षणीय उपस्थिती रामरक्षा स्तोत्राचे सलग १३ वेळा आणि त्यानंतर मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले.  सकाळच्या सत्रात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाला सुरवात झाली असून, आजच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात  देवेश्ववर शास्त्री आर्वीकर यांच्या मार्गदर्शनात रामरक्षा आणि मारूती स्तोत्राचे पठण संपन्न झाले.
यावेळी मुख्य अतिथि म्हणून विश्व हिंदू परिषदे महंत श्री भागीरथी महाराज,  विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजू पवनारकर, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री नीलकांतजी गुप्ता आणि संस्कार भारतीच्या प्रमुख कांचनताई गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका श्रद्धा पाठक यांनी योगाचार्य रामभाऊ खांडवे यांचा स्वागत सत्कार केला. सोमूजी देशपांडे, अलोक घाटे, प्रतिभाताई दटके, संजय कोतवालीवाले, सीमा घाटे, श्री देहाडराय हे सर्व मान्यवर  देखील प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना  विश्व हिंदू परिषदे महंत श्री भागीरथी महाराज  म्हणाले कि भारत देश केवळ स्वतः पुरता विचार करत नसून विश्वमांगल्याची कल्पना करतो. प्रभू श्रीराम देखील विश्वकल्याणाचा मार्ग दाखवतात. राम रक्षा आणि मारोती स्तोत्र पठण हे पावन पुनीत असून त्यातून सकारात्मकता उत्सर्जति होते असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, सुरुवातीला सहजयोग संस्थेतर्फे योगाभ्यास घेण्यात आला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात योगाभ्यास आणि ध्यानाची छोटी प्रात्यक्षिके करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
……………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या