नागपूर,ता.२५ सप्टेंबर २०२४: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विविध सांस्कृतिक संघटनांना भरघोस सहकार्य केले जात आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे दमदार आयोजन करणा-या या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पुढाकारामुळे संत्रानगरी नागपूरची ‘सांस्कृतिक नगरी’ म्हणून स्थापित होण्याकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे, असे मत खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मागील तीन वर्षांपासून गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदोत्सव मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीद्वारे केले जात आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये एकुण 230 कार्यक्रम आयोजित केले गेले. पूर्वमध्ये – 36, पश्चिम – 34, उत्तर – 38, दक्षिण – 42, मध्य – 41 आणि दक्षिण-पश्चिम – 39 सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सुगम संगीत, भक्ती संगीत, शास्त्रीय नृत्य, भजन, जागरण, भारूड, गीतरामायण या कार्यक्रमांचा समावेश आहे. आम्ही पण भारी बाप्पा, महिला कलाकारांनी सादर केलेले विनोदी नाटक तुमचं आमचं सेम असतं या नाटकांसह सामाजिक संदेश देणारे तसेच, स्वामी विवेकानंद व इतर स्वातंत्र्यवीरांवर आधारित नाटक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित नृत्यांचादेखील त्यात समावेश आहे.
दुर्गोत्सवात ढोलताशासह जागर मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीदेखील 3 ऑक्टोबर पासून सुरू होणा-या या दुर्गोत्सवात ढोलताशासह देवीचा जागर केला जाणार आहे. ज्या दुर्गोत्सवात मंडळांना देवीचा जागर करायचा असेल त्यांनी विधानसभा क्षेत्र निहाय स्थापित करण्यात आलेल्या संयोजकांशी जसे, पश्चिम क्षेत्र- दिलीप जाधव – 9823132858, दक्षिण पश्चिम – नितीन तेलगोटे – 9373106333 आणि मनिषा काशीकर – 9822430460, दक्षिण – संदीप गवई – 9822472473, मध्य – किशोर पाटील – 9422107373, उत्तर – भोलानाथ सहारे – 9766790096 व पुर्व – महेंद्र राऊत- 982225689 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. अनिल सोले यांनी केले.
सांस्कृतिक संघटनांना मदत
शहरात संगीत महोत्सव, नाट्य महोत्सव, विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयेाजन केले जाते. या कार्यक्रमांना खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने भरघोस मदत आणि सहकार्य केले जाते. समितीच्या सहकार्याने नुकताच स्व. गोपाळराव वाडेगावकर दि्दिवसीय संगीत समारोह पार पडला असून खासदार चषक शालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धा, संस्कृत बालनाट्य स्पर्धांनाही समितीचे सहकार्य लाभले आहे. कलाकारांना मंच मिळावा, रोजगार मिळावा व कला, संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. मागील पाच वर्षात शहरातील सांस्कृतिक चळवळीने वेग घेतला असून आयोजनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पत्रकार परिषदेला खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवडकर, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील,मनिषा काशीकर यांची उपस्थिती होती.