नागपूर,ता. १४ सप्टेंबर २०२४: हिंदी दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, विभागीय केंद्र नागपूर आणि बाल रंगभूमी परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वर्षा खालील शालेय विद्यार्थ्यांसाठी साभिनय काव्य पठण स्पर्धेचे आयोजन राष्ट्रभाषा संकुल (व्होकहार्ट हॉस्पिटलच्या मागे) येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला विविध शाळांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरवात झाली. परीक्षक म्हणून डॉ सोनू जेस्वानी आणि रुपाली मोरे यांनी परिक्षण केले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल रंगभूमी परिषद अध्यक्ष आभा मेघे यांनी केले, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा नागपूर अध्यक्ष ऍड भास्कर पाटील यांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, परीक्षक डॉ सोनू जेसवानी यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले तर परीक्षक रुपाली मोरे यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
कार्यक्रमाचे संचालन अनिल देव यांनी तर आभार सुनीताताई मुंजे यांनी मानले.कार्यक्रमाला बाल रंगभूमी परिषद कार्याध्यक्ष संजय रहाटे, सचिव रोशन नंदवंशी, सहसचिव वैदेही चवरे, विलास कुबडे, डॉ अनिल कवडे, अमोल निंबार्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
वर्ग १ ते ५ अ गट प्रथम क्रमांक अदिती अखाडे एस ओ एस वर्धा, द्वितीय ओम कुलकर्णी एस ओ एस अत्रे लेआऊट, तृतीय पाखी शर्मा भवंस त्रिमूर्ती नगर, उत्तेजनार्थ गुंजन बरडे आदर्श विद्या मंदिर, जहा राणा सेंटर पॉईंट अमरावती रोड,
वर्ग ६ ते १० ब गट प्रथम क्रमांक प्रगवंशी भेदे सोमलवार रामदासपेठ, द्वितीय चेतना खेडूलकर भगवती गर्ल्स, तृतीय देवर्षी नंदवंशी सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट, अन्वेशा कोलारकर भवंस श्रीकृष्ण नगर, नमन धर्मांनी भवंस कोराडी.
……………………….