नागपूर. इंदोरा चौकातील रजत टॉवरमधील एका फ्लॅटचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप व कोंडा तोडून घरातील 3 लाख 30 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलम नानकचंद लालवानी (48) यांचे इंदोरा चौकातील रजत टॉवर येथील अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक 303 आहे. बुधवारी ते दुपारी बाराच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्याने घरातील कपाटात असलेले 30 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 30 हजारांचा मुद्येमाल लांबविला. लालवानी हे दुपारी पावेने दोनच्या दरम्यान घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.