नागपूर. शहरात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 2 प्रकरणात 3 आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून 3 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये 5 प्रकरणात 8 आरोपींना अटक करून 7 हजार 141 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच प्रमाणे मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 69 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण 1362 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून एकूण तडजोड शुल्क 2 लाख 97 हजार 900 रुपये वसुल करण्यात आले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे, वाहतूक शाखेच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.