अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील घटना
नागपूर,ता. १ ऑक्टोबर २०२४: पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीमध्ये काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री १०.३० ते ११.३० च्या सुमारास सुदाम नगरी पांढराबोडी, हनुमान मंदिराच्या जवळ बंटी देविदास उईके यांच्या घरात सागर नकुल नागले उर्फ टूनां (वय २७ वर्ष, राहणार खोब्रागडे किराणा दुकानाजवळ सुदाम नगरी पांढराबोडी)याची हत्या झाली होती.या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी लावला असून अरोपींना ताब्यात घेण्यात अाले आहे.
सर्व आरोपी व मृतक दारु पित बसले असताना मृतकाने अारोपी विनोद थापा याला,त्याच्या मामे बहीणीसोबत त्याचे प्रेम संबंध असून शारिरीक संबध जोडले असल्याचे सांगितले.यावर आरोपी विनोद थापा (वय अठरा वर्ष, काम मजुरी राहणार सुदाम नगरी खोब्रागडे किराणा दुकानाजवळ पांढरा बॉडी,व्यवसाय -मजुरी)याने रागाच्या भरात सोफ्याखाली ठेवलेला गट्टू घेऊन मृतकाच्या डोक्यावर हाणले.
यात सहभागी अजित संतन नेताम (वय २६ वर्ष ,राहणार शिव मंदिर जवळ सुदाम नगरी व्यवसाय:- पेंटिंग काम मजुरी) सुरेश मनोहर यादव (वय २५ वर्ष, राहणार खोब्रागडे किराणा स्टोअर जवळ सुदाम नगरी पांढरा बोडी, व्यवसाय- हात मजुरी)यांना देखील अटक करण्यात आली आहे.या दोन्ही आरोपींनी देखील गट्टू उचलून मृतकाच्या डोक्यात वारंवार मारुन त्याला ठार केले व पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच डीबी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक टीम, आयकार यांना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला .घटनास्थळावरून साहित्य जप्त केले गेले, सर्व आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
मृतकाचे शव पुढील कार्यवाही करता मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात अाले असून,घटनास्थळावर, व आरोपींच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात आहे .परिसरात शांतता असल्याची माहिती अंबाझरी पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी दिली .
………………………………