फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममध्यरात्री रिलू मालूला यासाठी केली अटक...

मध्यरात्री रिलू मालूला यासाठी केली अटक…

नागपूर,ता.२७ सप्टेंबर २०२४: रामझुला पुलावर मर्सिडिज कारने दोघांना अपघातात ठार केलेल्या प्रकरणात रितिका उर्फ रितू मालूचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने रद्द केला होता.दरम्यान तपास अधिका-यांना अटकेची मुभा दिली होती.त्यानुसार ,रितू मालू हिला राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने(सीआयडी)बुधवारी मध्यरात्री अटक केली.ती पळून जाण्याची शक्यता असल्याने सीआयडी पथकाने विशेष परवानगी घेऊन तिला मध्यरात्री अटक केली.

रामझुला अपघात प्रकरणातील रितू मालू ही आरोपी घटनेनंतरच्या काळात जवळपास एक महिना बेपत्ता हाेती.ती राजस्थानात असल्याचे तिने मान्य केले होते.तसेच या प्रकरणी तिने तपास यंत्रणेला कोणतेही सहकार्य केले नाही.त्यामुळे ती पळून जाण्याची शक्यता असल्याचे रात्रीच तिला अटक करण्याची परवानगी सीआयडीने न्यायालयाला सीआरपीसीच्या विशेष तरतुदीनुसार मागितली होती जी न्यायालयाने मान्य केली.त्यामुळे आरोपी मालूला मध्यरात्रीच सीआयडीने अटक केली.
२४ फेब्रुवरी रोजी झालेल्या रामझुला हिट ॲण्ड रन अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता.तहसील पोलिसांचा तपास निष्पक्ष नसल्याने अपघातातील मृतकांच्या कुटूंबियांची मागणी मान्य करीत उच्च न्यायालयाने तपास सीआयडीकडे वर्ग केला.त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयाने रितू मालूला दिलेला जामीन रद्द केला.नियमानुसार,महिलेला सूर्यास्त ते सूर्योदयापर्यंत अटक करता येत नाही.मात्र,रितू मालू पळून जाण्याची शक्यता असल्याने तिला रात्रीच अटक करण्यात आली.सीआयडीने रात्री दीड वाजताच्या सुमारास तिच्या घरातून ताब्यात घेतले.पहाटे साढे पाच वाजता तिला अटक केल्याचे दाखविले.त्यानंतर गुरुवारी तिला परत प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ए.व्ही.खेडकर-गरड यांच्या समक्ष हजर केले.

यावेळी सीआयडीने न्यायालयाला सांगितले,की प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी रितूच्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची आवश्‍यकता आहे.मृतकांच्या कुटूंबियांचे वकील अमोल हूंगे यांनीसुद्धा पोलिस कोठडीचे समर्थन केले.मात्र,रितूचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी याला विरोध केला.रितूची चौकशी झाली असून तिने तपासात सहकार्य केले असल्याचे जलतारे यांनी युक्तीवाद करीत रितूच्या कोठडीला विरोध केला.

गुन्हा किरकोळ असो किवा गंभीर असो,कोणत्याही गुन्ह्यात आरोपीला एकदा ताब्यात घेतल्यानंतर परत एकदा पोलिस कोठडीची मागणी करायची असल्यास ती पंधरा दिवसांत करावी लागते.या गुन्हयात मालूला २५ फेब्रुवरी रोजी अटक झाली होती.त्यानंतर तिच्यावर कलम ३०४(ए)ऐवजी ३०४ हे कलम दाखल करण्यात आले.मात्र,ते याच गुन्ह्यात असून हा नवा गुन्हा नाही.ही नवी घटना नाही.त्यामुळे तिला पोलिस कोठडीत पाठविता येणार नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने तिची पोलिस कोठडी नाकारली व न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
……………………

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या