फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपती-पत्नी दोघेही गांजा तस्कर!तब्बल ९३ किलो गांजा जप्त

पती-पत्नी दोघेही गांजा तस्कर!तब्बल ९३ किलो गांजा जप्त

आर्यनगर परिसरात रचला सापळा:दाम्पत्यासह तस्करांची टोळी गजाआड
ओडिशा,आंध्र प्रदेशातून सर्वाधिक तस्करी
नागपूर,ता.२२ सप्टेंबर २०२४: गुन्हेशाखेच्या अमली पदार्थाविरोधी पथकाने जरीपटक्यातील आर्यनगर परिसरात सापळा रचून तब्बल ९३ किलो गांजा जप्त केला.याप्रकरणात पोलिसांनी दाम्प्तयासह तस्करांच्या टोळीतील पाच जणांना अटक केली.हा गांजा ओडिसाहून आला होता.
उमरेखान अब्दुल रशीद खान(वय ३०),त्याची पत्नी दरक्षा अंजुम उर्फ रानू(वय२९,दोन्ही रा.कांजी हाऊस चौक,रमाईनगर)शेख रिजवान शेख युनूस(वय २४,रा.बडनेरा,अमरावती),अब्दुल आरीफ अब्दुल खालिक(वय ३२,रा.आजरी-माजरी)व मोहम्मद जुनैद इब्राहिम राजवानी(वय ३१,रा.शिवनगर)अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.जुनैदने अमरावती येथील काशिफ अहमद याच्याकडून माल आणल्याचे सांगितले.पोलिस काशिफचा शोध घेत आहेत,अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी शनिवारी सिव्हिल लाईन्समधील पोलिस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.

उमरेखान याच्याविरुद्ध तस्करी,शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह आठपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून,त्याला तडीपारही करण्यात आले होते. त्याच्या पत्नीविरुद्धही तस्करीचे चार गुन्हे दाखल आहेत.आरीफही गुन्हेगार असून,जुनैदविरुद्ध अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.उमरेखान व त्याच्या पत्नीकडे गांजाची मोठी खेप आल्याची माहिती गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे रोहित काळे यांाना मिळाली.काळे यांनी उपायुक्त राहूल माकणीकर यांना याबाबत कळवले.माकणीकर,साहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.अभिजित पाटील यांनी कारवाईसाठी योजना आखली.माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक गजानन गुल्हाने,साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज घुरडे,विजय यादव,रोहित काळे,शैलेश डोबले,नितीन साळूंके,पवन गजभिये व त्यांच्या सहका-यांनी कांजी हाऊस परिसरात सापळा रचला.पोलिसांनी पाच जणांना अटक करीत १८ लाख ६२ हजार रुपये किमतीचा ९३ किलो गांजा व कार जप्त केली.
अमरावतीहून विक्री-
उमरेखान व पत्नी दरक्षा हे दोघे नागपूरात गाजांची खेप बोलवितात.मात्र, दोघेही नागपूरात गाजांची विक्री करीत नाहीत.शिवाय,घरात गांजा ठेवत नाहीत.परिसरात खाेली भाड्यााने घेऊन अथवा कारमध्ये गांजा ठेवतात.नागपूरात दोघेही गांजाची खेप अमरावतीच्या तस्कराला पाठवतात.तेथून अमरावतीचे तस्कर नागपूर वगळता संपूर्ण विदर्भात गांजाची विक्री करतात.गुन्हेशाखेचे पथक गेल्या चार महिन्यांपासून या दोघांच्या मागावर होते,अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त यांनी दिली.
ओडिसा व आंध्र प्रदेशातून नागपूरात गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.अद्याप नागपूर पोलिस हे नेटवर्क उदवस्त का करु शकले नाही?अशी विचारणा केली असता,पोलिस आयुक्त म्हणाले,की संबंधित राज्याच्या अधिका-यांशी लवकरच समन्वय बैठक घेण्यात येऊन तस्करांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.गंभीर गुन्ह्यांसह अमली पदार्थ विरोधी कायद्यानन्वये दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणांची लवकरात लवकर सुनावणी घेऊन तस्करांना शिक्षा व्हावी यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.
…………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या