फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपाचपावलीतील एमडी ड्रग्सचा कारखाना उघडकीस :श्रेय कोणाचे?

पाचपावलीतील एमडी ड्रग्सचा कारखाना उघडकीस :श्रेय कोणाचे?

(संग्रहीत छायाचित्र)

७८ कोटींची एमडी जप्त : डीआरआयची कारवाई
नागपूर,१२ ऑगस्ट २०२४ : पाचपावलीतील एका निर्माणाधीन इमारतीत सुरु असलेल्या मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थाच्या कारखान्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा घातला. डीआरआयने मेफेड्रोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेली एक छोटी प्रयोगशाळा आणि ७८ कोटी रुपये किंमतीचा १०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल जप्त केला. विदर्भातील ही एमडी बनविण्याची पहिली प्रयोगशाळा असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात दिल्ली किंवा थेट गोव्यावरून एमडी ड्रग्स तस्करी करून पोहचत होता. ड्रग्स तयार करण्याचा फार्मूला पूर्वी नायजेरियन वैज्ञानिकांकडे होते. नायजेरियातूनच भारतात ड्रग्स येत होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून भारतातच एमडी ड्रग्स बनविण्याचा प्रयोग करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून एमडी ड्रग्स तयार देशातील अनेक राज्यात एमडी तयार करणाऱ्या उच्चशिक्षितांच्या टोळ्या तयार झाल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत एमडी तयार करणारी प्रयोगशाळा नव्हती. परंतु, थेट नागपुरातील पाचपावलीतील एका निर्माणाधीन इमारतीत तीन आरोपींनी एमडी तयार करण्याची प्रयोगशाळा तयार केली होती. मुंबईतील डीआरआय पथकाला माहिती मिळाली. शनिवारी रात्रीच्या सुमारास डीआरआय पथकाने शोध मोहिम राबविली आणि इमारतीवर छापा घातला. तेथे ड्रग्स तयार करणारा संच आणि यंत्रणा उभारण्यात आली होती.
तीन आरोपींना पथकाने अटक केली. घटनास्थळावरून ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा १०० किलो ड्रग्स तयार होईल एवढा कच्चा माल, पावडर व द्रव स्वरुपात असलेला ड्रग्स जप्त करण्यात आला. ५० किलो एमडीचे साहित्य जप्त करण्यात आले. एकूण ७८ कोटी रुपयांचा माल पथकाने जप्त केला. ड्रग्स प्रयोगशाळेसाठी पैसा पुरविणारा युवक, दोन औषधनिर्माता असलेल्या युवकांना अटक करण्यात आली असून, आरोपींना पुढील चौकशीसाठी डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. या टोळीमध्ये आणखी काही आरोपींचा समावेश आहे.
या घटनेनंतर आज पोलिस विभागाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली.त्यात –
दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी डीआरआय व कस्टम विभाग नागपुर यांचे प्रमूख गौरव मेश्राम यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली की, पोलिस ठाणे पाचपावली परिसरातील बाळाभाऊ पेठ येथे हरिभाऊ निमजे यांच्या घरी चार दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या ओळखीचे ४ इसम हे राखी बनविण्याच्या निमित्याने आले असून,त्यांच्या खोलीत लिक्वीड केमिकलच्या माध्यमातून एमडी हे नशाकारक(मादक) पदार्थ बनवीत आहेत. अशा मिळालेल्या माहिती वरून डीआरआय नागपुर यांचे प्रमूख गौरव मेश्राम व त्यांची टीम हे सदर माहिती पोलिस स्टेशन पाचपावलीचे वपोनी यांना माहिती देऊन तसेच सदर महिती हे पोलिस उपायुक्त गून्हे यांना देऊन तसेच वपोनी पाचपावली तसेच निमित गोयल यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पाचपावली परिसरातील बाळाभाऊ पेट येथील हरिभाऊ निमजे यांच्या घरी चार दिवसांपूर्वी किरायाने राहणारे आरोपी इसम नामे १) आकाश हारुडे, रा. शांतीनगर नागपुर २) साहिल शेख, ३) सुमित गोनमोडे, ४) दिव्यांशू चक्रपाणी यांच्याकडे छापेमारी केली असता त्यांच्याकडून एकूण ५१.९५ किलो मेफेड्रान लिक्वीड केमिकल व एमडी बनविण्यासाठीचे साहित्य मिळून आले.
वर नमुद आरोपींना डीआरआय व कस्टम विभाग नागपुर यांनी पाचपावली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५ कायद्यानुसार कारवाही करण्यात आली आहे. आरोपी हे सध्या डीआरआय यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात  आले आहे,असे या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
परिणामी,एवढ्या मोठ्या कारवाईचे श्रेय हे नेमके कोणाचे?पाचपावली पोलिसांचे कि डीआरआयच्या पथकाचे?अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
……………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या