फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजप्रयागराजहून नागपूरला परतणाऱ्या बसचा अपघात

प्रयागराजहून नागपूरला परतणाऱ्या बसचा अपघात

प्रयागराजहून नागपूरला परतणाऱ्या बसचा अपघात
शहरातील दोन युवकांसह तिघे ठार

नागपूर. प्रयागराजहून नागपूरला येणारी पूजा ट्रॅव्हल्सची बस पहाटेला जबलपूर येथील करोंदा नाल्यात पुलावरून कोसळली. या भीषण अपघातात नागपुरातील दोन युवकांसह 3 जण ठार तर 47 जण जखमी झाले. रविवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास जबलपूरमधील करोंदा नाला येथे ही घटना घडली. मुरतलाल रामचंद्र गोंडाये (24, रा. यशोधरानगर, जुना कामठी रोड ) व राहुल सुरेश हुशगंडे (22, रा. राजीवगांधी नगर) अशी नागपूरातील मृतांची नावे आहे. मृतांमध्ये उत्तरप्रदेशामधील महू येथील रामू मनमोदन पाल (22) याचा समावेश आहे.
प्रयागराजहून युपी-70/एटी-5618 क्रमांकाच्या पूजा ट्रॅव्हल्स बसमधून प्रवासी नागपुरात येत होते. अधारताल ठाण्याअंतर्गत बायपासजवळील करोंदा नाल्याजवळ पहाटे साडेतीनच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बस नाल्याचा कठडा तोडून दरीत कोसळली. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 47 जण गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेद्वारे 12 जखमींना जबलपुरातील सिटी रुग्णालयात, 4 मेडिकल कॉलेज आणि 15 जखमींना विक्टोरिया रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे. सर्व प्रवासी प्रयागराजहून नागपूरला जात होते. करोंदा नाल्याच्या पुलावरून खाली पडलेल्या बसला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.
—————–
-महिलांसह चिमुकलेही जखमी
अपघातानंतर जखमी प्रवाश्यांचा एकच आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. बसमध्ये महिलांसह चिमुकलेही होते. यासोबत प्रवाश्यांकडे सामानही भरपूर असल्याने दरीत कोसळलेली बसमध्ये सगळ्यांचा जिव टांगणीला गेला होता. यातच आसपासच्या नागरिकांसह रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी प्रवाश्यांचा आवाज एकूण मदतीसाठी धावा घेतली.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या