फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूज'डोक्याला शॉट' द्यायला येतोय हा चित्रपट

‘डोक्याला शॉट’ द्यायला येतोय हा चित्रपट

‘डोक्याला शॉट’ देणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नावच ‘डोक्याला शॉट’ असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.
मुंबईत झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. कार्यक्रमात ट्रेलर सोबत चित्रपटाच्या संगीताचेही कैलास खेर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

चार मित्रांच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि त्यातून सुरु होतो ‘डोक्याला शॉट’. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा ट्रेलर पाहिल्यानंतर तरी व्यक्त केली जाऊ शकते.

अभिजीत (सुव्रत जोशी) आणि सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) हे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांचे लग्न ज्या दिवशी होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच एक घटना घडते, आणि त्यातून संपूर्ण चित्रपटाला कलाटणी मिळते. अभिजीत आणि त्याचे मित्र यांची या घटनेतून जी काही तारांबळ उडते आणि त्यातून सावरताना जी धमाल होते ती म्हणजे ‘डोक्याला शॉट’. एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे या चित्रपटाद्वारे त्यांचे अभिनय कौशल्य दाखवणार आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या