झी युवा ने २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला ‘वर्तुळ’ ही नवी मालिका सुरु केलीं होती . नावाप्रमाणेच ही मालिका माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुही गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय. जुई गडकरी बऱ्याच काळानंतर एका तगड्या भूमिकेद्वारे या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली. जुई मीनाक्षीची या पात्राची भूमिका साकारत आहे. तर अभिजित परांजपे म्हणजे अभिनेता विकास पाटील हा कथेचा नायक आहे. मिनाक्षी आणि अभिजितची भेट अपघाताने होते. अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि आता येत्या रविवारी १० फेब्रुवारीला रात्री ९ वाजता वर्तुळ या मालिकेचा महा एपिसोड दाखवला जाणार आहे. यात मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये घडणार आहे . या लग्नात हळदी , संगीत सगळंच असणार आहे . या लग्नात फुलपाखरू चे कलाकार त्याचप्रमाणे सूर राहू दे चे कलाकार सुद्धा नवजोड्याला शुभेच्छा द्यायला येतील . फुलपाखरू मधील मानस या संगीत मध्ये एक सुंदर गाणं गाणार आहे .