फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजस्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त सुवर्ण पदक वितरण समारोह ९ रोजी

स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त सुवर्ण पदक वितरण समारोह ९ रोजी

गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांचा होणार सत्कार
गोंदिया: दरवर्षीप्रमाणे स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने ९ फेबु्रवारी रोजी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात सुवर्ण पदक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल, खासदार प्रफुल्ल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सम्मान करण्यात येणार आहे.
दरवर्षी स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने जयंती समारोहाचे औचित्य साधून गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील प्राविण्य प्रााप्त विद्याथ्र्यांना सुवर्ण पदकाने सम्मानित केले जाते. यावर्षी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे समारोहाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल तर अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल हे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अतिथी म्हणून मध्यप्रदेशचे मंत्री प्रदीप जायस्वाल, म.प्र. विधानसभेचे उपाध्यक्ष हिना कावरे, खासदार मधुकर कुकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, विलासराव श्रृंगारपवार, आ.कामलाल शहारे, माजी खा.विश्वेश्वर भगत, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, आ. संजय उईके, माजी आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. दिलीप बन्सोड, अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या