फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनक्षल्यांनी केली आणखी एका युवकाची हत्या

नक्षल्यांनी केली आणखी एका युवकाची हत्या

गडचिरोली,दि.७: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विसामुंडी येथील एका युवकाची हत्या केली. आनंदराव संतु मडावी(३२) असे मृत युवकाचे नाव आहे.बुधवारच्या(दि.६)रात्री सशस्त्र नक्षली आनंदरावच्या गावी गेले. त्यांनी त्याला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि गळा चिरुन हत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह विसामुंडी गावाबाहेरच्या रस्त्यावर आढळून आला.मागील २० दिवसांत नक्षल्यांनी आठ जणांची हत्या केली असून, ८ वाहनांची जाळपोळही केली आहे.नक्षल्यांनी घटनास्थळी एक पत्रक टाकले असून, त्यात आनंदराव हा एकदा पोलिस भरतीसाठी गेला होता आणि नंतर तो एसपीओ म्हणून काम करीत होता. त्याचे वडीलदेखील पोलिसांचे खबरे होते, म्हणून त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे. पत्रकावर पेरमिली एरिया कमिटी असा उल्लेख आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या