फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमुख्याध्यापकाने केले अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण

मुख्याध्यापकाने केले अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण

खामगांव : राज्यात मुलींवरील अत्याचाराचे प्रकार थांबायचे नाव घेत नसून बुलडाणा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या अल्पवयीन मुलींचे मुख्याध्यापकाकडूनच लैंगिक शोषण होत असल्याचा संशय व्यक्त करत तसा आरोप दोन विद्यार्थिनीने केला आहे, तशी तक्रार समाज कल्याण विभागाला करण्यात आली असून तक्रार करणाNया विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाकडून मानसिक छळ केला जात आहे. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या निवासी शाळेत भोसले नामक मुख्याध्यापकांकडून अनेक वर्षापासून वेगवेगळ्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार तेथीलच विद्यार्थिनींनी समाज कल्याण विभागाकडे केली आहे.

सदर मुलींनी रात्री अकरा वाजताचे सुमारास एका मुलीला मुख्याध्यापकांच्या खोलीमधून तोंडाला कपडा बांधून निघतांना पाहिले बाकी मुलींना संशय आल्याने त्यांनी या प्रकाराची चौकशी केली असता गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या मुलींचे शोषण होत असल्याची धक्कादायक माहिती संबंधित मुलींनी सांगितली आहे.
मुलींनी हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला असून वडिलांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले व तोंडी तक्रार दिली त्या तक्रारी वरून पोलिसांनी मुलींची महिला पोलीस कर्मचाNयांकडून चौकशी केली असता मुलींनी होत असलेला सर्व प्रकार विषद केला त्यानुसार शाळेमध्ये तक्रारपेटी लावण्यात आली ज्यामध्ये दहा ते पंधरा तक्रारी याच बाबतीत टाकल्याचेही सांगण्यात आले असून पोलिसांना देखील त्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. तक्रार दाखल केलेल्या मुलींना मुख्याध्यापक संजय भोसले यांच्याकडून मानसिक त्रास देण्यात येतोय त्यामुळे ह्या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत.

निवासी शाळा ही मुलींची असल्याने पुरुष मुख्याध्यापक त्याच ठिकाणी का राहतो. तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली, ज्यांचे प्रमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आहेत या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे असून पंधरा दिवस उलटूनही अजून मनोज मेरत यांनी अहवाल पाठवला नसल्याचे वरिष्ठांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पुरुष मुख्याध्यापकांना मुलींच्या शाळेत रात्री मुक्कामी राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचेही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त वनिता राठोड यांनी सांगितले आहे. त्यामुळे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत हे मुख्याध्यापक संजय भोसले यांना पाठीशी का घालत आहेत हे प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून या दुष्कर्म करणाNया मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या