आकोली : बोर व्याघ्र प्रकल्पसह प्रादे-ि शक वनविभागाच्या जंगलाला अचानक आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सागवानाची डेरेदार झाडे पडली. शिवाय, काही वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सुमारे २० हेक्टर जंगल परिसरात लागलेल्या या आगेवर नियंत्रण िम् ा ळ िव ण् य् ा ा व र व न् ा िव भ् ा ा ग् ा ा च् य् ा ा अधिकाºयांना यश आले असले तरी या आगीमुळे कोटींच्या वनसंपदेचे नुकसान झाल्याचे सांगितल्या जात आहे. ही आग लागली, की कुणी लावली याबाबत कुठलाही ठोस पुरावा अद्याप वनविभागाच्या हाती लागलेला नाही. शिवाय परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या मरकसूर, बोरगाव (गोंडी) व माळेगाव ठेका भागातील जंगल परिसराला अवघ्या काही तासांच्या कालावधीत आगीने आपल्या कवेत घेतले होते.
आग लागल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परंतु, आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत सुमारे १५ ते २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाल्याचे वास्तव आहे. बोर व्याघ्र प्रकल्प आणि त्याला लागून असलेल्या प्रादे-ि शक वनविभागाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवानाची वृक्ष आहेत. इतकेच नव्हे, तर वर्धा जिल्ह्याच्या या परिसराला सागवानाची खोरीच म्हणून ओळखल्या जाते. शिवाय या जंगल परिसरात अनेक औषधी वनस्पतीही आहेत.
या भागातील जंगल परिसरात वाघ, अस्वल, बिबट या हिंसक वन्यप्राण्यांसह अनेकांना भुरळ घालणारे हरिण, रोही, निलगाय, ससे आदी वन्यप्राणीही आहेत. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे काही वन्यप्राणी भाजले असावे किंवा काहीं चा आगीत होरपळून मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाºयांकडून वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या कर्मचाºयांनी कुठल्याही अग्निशमन दलाच्या जवानांची मदत न घेता ब्लोअरच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी सुमारे ५० हेक्टर जंगल परिसराला आगीने आपल्या कवेत घेतले होते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.