यवतमाळ: दारव्हा येथील इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्याचे सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अपहरण झाले. ही घटना कळताच मुलाच्या कुटुंबियांसह अन्य नागरिकांनी अपहरणकर्त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. विनोद कदम यांचा बारा वर्षांचा सार्थक नावाचा मुलगा सकाळी शाळेत जात असताना त्याला काही अज्ञात व्यक्तींनी पकडले व त्याचे अपहरण केले. ही घटना कळताच मुलाच्या कुटुंबियांनी व अन्य नागरिकांनी गावाजवळ त्यांना पकडले. अपहरणकर्त्यांपैकी एकाला पकडण्यात यश मिळाले तर बाकीचे पळून गेले. पकडलेला अपहरणकर्ता हा त्या गावचा रहिवासी असून कदम यांचा नातेवाईक आहे. शेतीच्या वादातून मुलाचे अपहरण झाल्याची शक्यता आहे.