दिवाळीनिमित्त शेवटच्या मेट्रो ट्रेन च्या वेळेत बदल
नागपूर: दिवाळीच्या निमित्ताने, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी, मेट्रो सेवा संध्याकाळी ६ वाजे पर्यंत असेल. नागपूर मेट्रोच्या – खापरी, प्रजापती नगर, ऑटोमोटिव्ह स्केयर आणि लोकमान्य नगर – या चारही टर्मिनल स्टेशन वरून शेवटची मेट्रो गाडी संध्याकाळी ६ वाजता सुटेल.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस घरोघरी पूजा असल्याने प्रवासी संख्या कमी राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाची योजना यानुसार करण्याचे आवाहन नागपूर महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे सोबत नागपूरकरांना सुरक्षित आणि आनंदमय दिवाळीच्या शुभेच्छा महामेट्राेने प्रदान केल्या आहे.
…………………