श्याम मानव यांच्या वादग्रस्त भाषणात भाजप युवा मोर्चाचा गोंधळ
नुसते आरोप करुन मानव कोणता ‘बदल’घडवतात आहेत?नेटकरींचा सवाल
अंधश्रद्धा निर्मूलनाचे चांगले काम मात्र,आता डोळ्यांवर राजकीय पट्टी:नेटक-यांचा आरोप
नागपूर,ता.१६ ऑक्टोबर २०२४: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचे आज नागपूरातील सुरेश भट सभागृहात ’संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ’या शीर्षकाखाली भाषण सुरु होते,मूळात संविधान आणि महाराष्ट्राच्या निवडणूकींचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नसून,लोकसभेत ‘संविधान बचाओ,देश बचाओ’च्या चळवळीतून मिळालेले यश व त्यामुळे अंगावर मूठभर मांस चढल्याने, त्याच निवडणूक निकालांच्या पुनरावृत्तीचे ध्येय महाराष्ट्राच्या विधान सभेच्या निवडणूकीत साधण्यास सज्ज झालेले श्याम मानव हे उघडपणे महाविकासआघाडीचा विजय व महायुतीच्या पराभवासाठी ‘वैचारिक’मोहिम चालवित आहेत,हे कोणापासून ही लपलं नाही,त्यांनीही कधी लपवलं नाही मात्र,ज्या ‘संविधानाची’दुहाई देत ते हा जागर संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहेत त्या संविधानाविषयीच ते बोलत नाहीत,सांगतात तो फक्त पुरावे न देता इतिहास, खरं तर त्यांच्यापासूनच संविधानाला वाचवणे गरजेचे आहे,असे आता म्हटले जात आहे.
श्याम मानव यांच्या प्रत्येक भाषणात ते ‘शुद्र श्याम मानव’ असल्याची सर्वात आधी तर जाणीव करुन देत असतात,जेणेकरुन सभागृहातील उपस्थितांना त्यांची ‘जात’कळावी व त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण व्हावी,पुढे त्यांच्या भाषणातील सर्व ‘ऐतिहासिक’ किंबहूना ’काल्पनिक’संदर्भांना उपस्थितांची मूक संमती मिळावी,हा त्यांचा हेतू असावा.टिळकांच्या संदर्भातील त्यांची अत्यंत कडवट मते आणि उदाहरणेे,याचे कोणतेही दाखले किवा पुरावे ते सादर करीत नाहीत.त्यामुळे टिळकांची नुसती बदनामी करण्याचा हेतू असतो,अशी टिका समाज माध्यमात वाचायला मिळते.मनुस्मृति,सवर्णांचे स्तोम,संघ,शिवरायांनाही टिळकांनी जातीने शुद्र समजणे,गागाभट्टांचे उदाहरण,छत्रपतींचा राज्याभिषेक आणि वैदिक मंत्रोपचार ऐकण्याची छत्रपतींना आज्ञा नसणे,असे अनेक उदाहरण ते आपल्या प्रत्येक भाषणात गेल्या दशकभरापासून देत असतात मात्र,९०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचे कोणतेही दाखले ,संदर्भ किवा पुरावे ते आपल्या भाषणात देत नाहीत,हे त्यांचे चातुर्य!
त्यामुळे आपल्या भाषणातून त्यांना महापुरुषांचा आधार घेऊन केवळ सवर्णांवर आघात करने व निवडणूकींच्या तोंडावर आपली राजकीय पोळी शेकणे वरुन ‘संविधान बचाओ’चे त्या नुसती बदनामी करणा-या कार्यक्रमांना स्लोगन देणे,एवढंच कार्य श्याम मानवांचे राहीले आहे का?असा प्रश्न त्यांना विचारला जात आहे.
महत्वाचे म्हणजे ज्या काळाचे ते उदाहरणे देतात तो काळ आज राहीला आहे का?त्या काळी ज्यांना ‘शुद्र’म्हणून हिणवलं त्यांनी मनावर घेतलं त्यामुळेच देशाच्या आज किती आयआयटी शिक्षण संस्थांमध्ये हीच शुद्रांची मुले हिरिरीने शिकताना दिसून पडतेय,हे श्याम मानवांना दिसत नाही का?हा त्यांच्या कर्तृत्वाचा,उपजत बुद्धिमत्तेचा आणि जातीचाही अपमान नाही का?हजारो वर्षां पूर्वीच्या भूतकाळात त्यांना गुंतवायचे की संविधानाचा जागर करुन त्यांचा भविष्यकाळ सुखी करायचा?हे श्याम मानव यांना आता ठरवावे लागणार आहे.
अंधश्रद्धा निमूर्लनाचे अतिशय चांगले सामाजिक कार्य करणारे श्याम मानव यांनी आता स्वत: डोळ्यांवर ‘जातीवादाची’पट्टी लावली आहे का?अशी शंका येते.जे संविधानाची सर्रास पायमल्ली करतात आहेत आणि जे संविधानाची दुहाई देत जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व्यासपीठांवरुन करीत आहे,त्यांच्यात आणि श्याम मानव यांच्यात काय फरक आहे?असा सरळ सवाल श्याम मानव यांना विचारला जात आहे.आता लोकं फार कंटाळली आहे या सर्व प्रकारांना,त्यांचे जीवन-मरणाचे,आनंद सुख-दुखाचे प्रश्न फार वेगळे आहेत.त्यावर श्याम मानव यांनी संविधानाचा आधार घेऊन दिशा दाखवावी,असा देखील सल्ला त्यांना दिला गेला.माणूस हा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करुन जुळत नाही तर मुद्दांनी जुळत असतो.आज डिजिटल मिडीयाच्या काळात तर अफाट वेग वाढला आहे विचारांचा,संधीचा,समाजातील,राज्यातील,देशातील प्रश्न काय आहेत?संविधानानुसार ते सोडवले जात आहेत का?भ्रष्टाचार,बेरोजगारी,महागाई,मूलभूत सोयी सुविधांनाही वंचित असणारे भारताचे नागरिक,आरोग्य,शिक्षण हे विषय संविधानात येत नाहीत का?की फक्त ‘जात’येते?
नागपूरातच येणा-या महानगरपालिकेची निवडणूक सर्वच जाती-धर्माचे नव्या दमाचे सुशिक्षीत तरुण मिळून लढण्याची एक बैठक आज पार पडली.भ्रष्टाचाराने बरबटलेल्या,किडलेल्या,सडलेल्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेला बदलण्यासाठी त्या तरुणांचे प्रयत्न याचे कौतूक व्हायला हवे.माहितीच्या अधिकारात महायुती सरकारने केवळ जाहीरातींवरच २०० कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.हा कोट्यावधीचा खर्च योजनांच्या जाहीरातींपेक्षा प्रत्यक्ष योजनांवर केला असता तर आज भारताचे आणि महाराष्ट्राचे दृष्य वेगळे राहीले असते.बदल जेव्हाच घडेल जेव्हा सामान्य माणूस जागा होतो,श्याम मानव हे सामान्य माणसाला,आजच्या परिपेक्षात जागे करण्या ऐवजी भूतकाळातील घटनांमध्ये अडकवू पहात आहेत.संविधानाने दिलेले स्वातंत्र्य,अधिकार यांचा उल्लेख करताना त्यांना तरी त्यांच्या पत्नी विषयी बोललेले आवडेल का?हा साधा प्रश्न आहे.