फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजदेवा भाऊला धन्यवाद कशासाठी?

देवा भाऊला धन्यवाद कशासाठी?

‘हम भारत के लोग’अभियानाचे सदस्य यांचा सवाल
नागपूर,ता.१४ ऑक्टोबर २०२४: राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात जी जाहीरात प्रसिद्ध केली ती बघून आम्ही ’हम भारत के लोग’या पुरोगामी संघटनेचे सदस्य आश्‍चर्यचकीत झालो.ओबीसी महासंघाने आमच्या अनेक पुरोगामी विचारधारेच्या चळवळीत हिरिरीने आणि बरोबरीने हिस्सा घेतला होता.अनेक वेळा ओबीसी महासंघ हा ‘अराजकीय’असल्याचे महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी सांगितले,मग आज महासंघाने ही ‘राजकीय’जाहीरात देण्यामागे काय उद्देश्‍य आहे?देवा भाऊला धन्यवाद कशासाठी?असा सवाल अभियानाचे सदस्य अरुणा सबाने,प्रज्वला थत्ते यांनी पत्रकार परिषदेत केला.
आज अनेक दैनिकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा जाहीर करणारी जाहीरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने प्रसिद्ध झाली.या जाहीरातीनंतर विविध ओबीसी संघटनांनी पत्रकार परिषद घेतली.‘हम भारत के लोक’अभियानाच्या सदस्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या जाहीरातीचा तीव्र निषेध नोंदवला.महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी फोनच उचलला नाही मात्र,इतर पदाधिकारी यांनी,अशी कोणतीही जाहीरात दिली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे थत्ते यांनी सांगितले.

(छायाचित्र : सर्व दैनिकात प्रसिद्ध झालेली हीच ती जाहीरात!)

मग,देवाभाऊंनी वेबसाईटवरुन फोटो चोरुन जाहीरात प्रसिद्ध केली का?असा सवाल त्यांनी केला.जाहीरातीचा खर्च कोणी केला?ही खोटी जाहीरात जनतेच्या पैशांनी प्रसिद्ध झाली आहे का?आम्ही पण ओबीसी समाजाचे आहोत त्यामुळे समाजाचे सदस्य म्हणून आम्हाला या जाहीराती मागे कोण आहे?याची माहिती हवी,असे त्या म्हणाल्या.या जाहीरातीत ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या,हे वाक्य तर समाजाला दाखवलेले गांजर असल्याची टिका त्यांनी केली.स्थानिक स्वराज्य  संस्थांमध्ये ओबीसींच्या जागा राखीव झाल्या नाहीत,कोर्टात हा विषय लटकवून ठेवण्यात आला आहे.स्पर्धा परिक्षांचे शुल्क कमी केले नाही,वसतीगृहांची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे,त्याला फक्त मान्यता देण्यात आली आहे,नव्या  शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागात शाळा या दूर-दूर झाल्या आहेत.दहावी,बारावीपर्यंत शिक्षण घेण्यास ग्रामीणचा विद्यार्थी धडपडत आहे मग शहरात वसतीगृह कोणासाठी बांधताय?असा सवाल अरुणा सबाने यांनी केला.
पूर्वी एमएसईमी सेक्टर ओबीसी समाज चालवित होता. अनेकांना रोजगार मिळत होते.फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शिष्यवृत्ती बंद केली.खूप ओरडा झाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम खूप कमी करुन ती पुन्हा सुरु केली.नोटबंदीने ओबीसींचे आणखी कंबरडे मोडले,इतक्या गोष्टी असताना ओबीसी समाज देवा भाऊंचा ऋणी कसा राहू शकतो?असा सवाल सबाने यांनी केला.
जातगणना झाल्याशिवाय ओबीसीला न्याय मिळू शकत नाही मात्र,भाजप राजकरणाच्या खेळातून जातगणना करण्यासाठी उत्सुक नाही.त्यांना जाती-जाती,धर्माचे राजकारण करुन सत्ता मिळवत राहायची आहे.असा खरमरीत आरोप करीत,हरियाणात देखील जाट वर्सेस ओबीसीचा खेळ करुन भाजपने हरियाणात निवडणूक जिंकली असल्याचे प्रज्वला थत्ते म्हणाल्या.महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असून इथला दलित,ओबीसी हा जागृत आहे,भाजपची खेळी महाराष्ट्रात चालणार नाही,असे थत्ते यांनी ठणकावले.
ज्याप्रकारे ईव्हीएस(एकॉनॉमिक वीकर सेक्शन)ची योजना आणून आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण घटनेत समाविष्ट केले तशीच सुधारणा करुन आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याहून अधिक करण्याची मागणी त्यांनी केली.ओबीसी-मराठांमध्ये भांडणे लाऊन भाजप या राज्यात पुन्हा सत्ता हस्तंगत करु पहात आहे,असा आरोप त्यांनी केला.
शाहू,फूले,आंबेडकरांची विचारधारा मानणारे आणि ‘जय जिजाऊ,जय संभाजी’ यांच्या जय घोषाने ज्यांची सुरवात होते त्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देवा भाऊ म्हणजे देेवेंद्र फडणवीस यांच्या धन्यवादाची जाहिरात कशी दिली?कशासाठी दिली?असा सवाल सबाने यांनी केला.

गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात पोलिस हे पिडीत महिलेला तक्रार नोंदवायला गेल्या असता,मारलं तर काय झालं नव-यानी?असा संतापजनक व्यवहार करतात,लहान-लहान मुलींवर अत्याचार होतो,

अशा पद्धतीने राज्याचे गृहमंत्रालय काम करीत असेल तर कशासाठी मानायचे देवा भाऊचे आभार?असा खरमरीत सवाल त्यांनी केला.
आज प्रसिद्ध झालेली जाहीरात जर तायवाडे यांच्या संमतीशिवाय प्रसिद्ध झाली असेल तर ही संपूर्ण ओबीसी समजाची फसवणूक असल्याचा आरोप याप्रसंगी अरुणा सबाने यांनी केला.
………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या