देवेंद्र फडणविसाच्या जवळील मुन्ना यादवला इतके अभय का ?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल
नागपूर, दि.७ ऑक्टोबर २०२४: राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या अतीशय जवळचे व भाजपाचे नेते मुन्ना यादव यांची गुंडगीरी दिवसेनदिवस वाढतच आहे. पोलिसांना ते जुमानत नसुन पोलिस स्टेशनमध्येच मुन्ना यादव व त्यांचे सहकारी वरीष्ठ पोलिसांच्या अंगावर धावून जातात, त्यांना धमक्या देतात. मुन्ना व त्याचे सहकारी मारहाण करतात, त्यात ४ जण गंभीर जखमी होवून त्या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. मुन्ना यादव व त्याच्या सहकाऱ्यांना पोलिस कोणाच्या दबावाखाली अभय देत आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थीत केला आहे.
मुन्ना यादव यांच्या विरुध्द नागपूर शहरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असतांना पोलिसांकडुन त्याला नेहमीच अभय देण्यात येत आहे. मुन्ना यादव हा भाजपाचा कार्यकर्ता असून तो देवेंद्र फडणविस यांच्या जवळचा आहे. मुन्ना यादव याची नागपूर शहरात इतकी दशहत आहे की, त्याच्या विरुध्द कोणी तक्रार देण्यास पुढे येत नाही. २०१४ ते २०१९ पर्यत देवेंद्र फडणविस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असतांना त्याच्या विरुध्द गंभीर गुन्हाचे आरोप होते. तरी सुध्दा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षपद दिले. देवेंद्र फडणविस गृहमंत्री पदाचा दुरउपयोग करुन गुडांना अभय देत आहे काय ? असा प्रश्न सुध्दा अनिल देशमुख यांनी उपस्थीत केला.
चुनाभट्टी परिसरात शनिवारी रात्री मुन्ना यादव व त्याच्या गुडांनी काही जणांना मारहाण केली. यात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. असे असतांना त्याच्या विरुध्द कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मारहाणीनंतर मुन्ना यादव व त्याच्या सहकार्यांनी पोलिस स्टेशनला येवून वरीष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देवून पोलिसांच्या अंगावर हात सुध्दा उगारला तसेच बघुन घेण्याची धमकी दिली. या प्रकरणात त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी चुनाभट्टी येथील गँगवार प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या दोन्ही प्रकरणात मुन्ना यादव याच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
पोलिस विभागात नाराजी-
मुन्ना यादव याच्या गुंडगीरीमुळे पोलिस विभाग सुध्दा त्रासला आहे. सामान्य नागरीकांना तो तर धमकावतोच पण पोलिस विभागातील वरीष्ठ अधिकारी ते अंमलदारांच्या अंगावर हात उगारुन त्यांनाही बघुन घेण्याची धमकी देतो. असे असतांना गृहमंत्री देवेंद्र फडणविस त्याला वाचवितात आणि मुन्ना यादव याच्या विरुध्द कारवाई करण्यासाठी रोखतात असा दबाक्या आवाजात पोलिस विभागात सुर आहे. फडणविस हे मुन्नाला अभय देत असल्याचे नागपूर पोलिस विभागात नाराजीचा सुरु असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगीतले.
………………………..