फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

हे भगवान…

तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गाईच्या चर्बीची भेसळ!
नागपूर,ता.१९ सप्टेंबर २०२४: जगप्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीच्या लाडवाच्या प्रसादामध्ये गाईच्या चर्बीची भेसळ असल्याची शंका अन्न व प्रशासन अायोगाच्या अहवालात प्रसिद्ध झाले असून,या घटनेतू लाखो भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील या अहवालाचा आधार घेत, मागील वायएसआर सरकारवर कठोर टिका केली आहे.अहवालानुसार लाडवाच्या या प्रसादामध्ये जनावरांची चर्बी आणि मासोळीचे अंश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.हे लाडू ज्या तूपात बनतात ते तूप निम्न दर्जाचे असून त्या तूपातच भेसळ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बाजारात गायीच्या दूधापासून तयार झालेले जे तूप एक हजार प्रति किलो दराने मिळते ते तिरुमला तिरुपती देवस्थान समिती, लाडवांच्या प्रसादासाठी अवघ्या  तीनशे पंचवीस रुपये किलो दराने विकत घेत असते.त्यामुळे हे तूपच भेसळ असल्याचे वास्तव समोर आले आहे!या तूपात गाईच्या चर्बीची भेसळ तसेच मासोळीचे अंश असल्याची शंका २३ जुलै २०२४ च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

गाय जर आजारी असेल किवा कुपोषित असेल,पाम तेलाचे सेवन केलेले असेल तर अश्‍या गायीच्या दूधापासून तयार झालेल्या तूपात चर्बीचे अंश पोहोचू शकतात,असे हा अहवाल सांगतो.
तिरुपती बालाजीचे दर वर्षी साढे तीन कोटी भाविक दर्शन घेत असतात.हे सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून गणले जाते.दर वर्षी तिरुपती बालाजीला साढे तीन हजार कोटींचे दान प्राप्त होत असते.यातील ५००-६०० कोटींचा लाडवाचा प्रसाद भाविकांना विकल्या जातो.यातूनही ५० कोटी रुपये आंध्र प्रदेशच्या सरकारला दिले जातात.वायएसआर रेड्डी सरकारवर यातूनच चंद्राबाबू नायडू यांनी टिकास्त्र सोडले.प्रसादाच्या लाडवांमध्ये भेसळ आहे हे मंदिर समिला माहिती नव्हते का?असा सवाल टीडीपीचे नेते ए.बी.रेड्डी यांनी केला.
मंदिर समितीचे माजी अध्यक्ष वाईवी सुब्बा रेड्डी यांनी तसेच टीटीपीचे पूर्व अध्यक्ष भूमना रेड्डी यांनी या आरोपांना निराधार म्हटले आहे.
परिणामी,पुन्हा एकदा या लाडवाचे नमूने तपासून अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी केली जात आहे.हा कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्‍न असून या आरोपांमध्ये राजकारण आहे की भ्रष्टाचार?याचा उलगडा झाला पाहिजे,अशी भाविकांची मागणी आहे.
…………………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या