
अखेर गडकरी उतरले प्रचारात!
नागपूर,ता. २६ नोव्हेंबर: पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारात उशिरा का होईना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी अखेर प्रचारासाठी उतरले,त्यांनी संदीप जोशी यांना रेकॉर्ड मतांनी विजयी करा,असे आवाहन आज गुरुवारी कार्यकर्त्यांना केले.मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना गडकरी यांनी अखेर जोशी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आणि जोशी यांनी सुटकेचा श्वास सोडला.
विद्यमान आमदार प्रा.अनिल सोले यांचे ऐनवेळी तिकीट कापून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर संदीप जोशी यांच्या पाठीमागे पाठबळ उभे करुन त्यांना उमेदवारी दिली परिणामी गडकरी हे कमालीचे दुखावले गेले,अशी कार्यकर्त्यांमध्येच चर्चा होती.
१२ नोव्हेंबर रोजी जोशी यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एवढ्या प्रदीर्घ काळाचा प्रचार संपल्यानंतर आज गुरुवारी गडकरी यांनी संदीप जोशी यांच्यासाठी शब्द खर्ची घातला व संदीप जोशी यांना रेकॉर्ड मतांनी विजयी करा असे आवाहन मतदारांना केले.
संगठन कौशल्य व कार्यकर्ता होऊन कार्य करण्याची क्ष् मता संदीप जोशी यांच्यामध्ये असल्याचे ते म्हणाले.भाजपच्या उमेदवाराला हरवण्यासाठी आपापसात मतभेद असणारे आघाडीतील पक्ष् एकत्रित आल्याची टिका देखील त्यांनी केली.
संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री व विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस नागपूर मुक्कामी राहून गेलेत.याशिवाय विधान परिषद विरोधी पक्ष् नेते प्रवीण दरेकर यांनी देखील काल बुधवारी नागपूरात पत्र परिषद घेतली.माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे हेच या निवडणूकीचे प्रमुख पदी असल्याने त्यांनी पूर्ण जोर लावला आहे.माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील गेल्या १३ दिवसात पदवीधर मतदारांसाठी रॅली व बैठकांचा सपाटा लावला.
गुरुवारी गडकरी यांनी व्हर्च्यूल रॅलीच्या माध्यमातून पूर्व विदर्भाच्या खासदार,आमदार,पदाधिकारी तसेच जवळपास ४ हजार कार्यकर्त्यांना संबोधित केले. स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस,वी.ग.देशपांडे,अनिल सोले व त्यांनी स्वत: या मदतार संघातून विधान परिषद गाठली आहे.यावेळी संदीप जोशी यांच्यासारखा सळसळत्या उत्साहाचा तरुण ही निवडणूक लढवित असल्याचे ते म्हणाले. जोशी हे महापौर असून दोन वेळा स्थायी समितीचे सभापतीही देखील राहीले आहेत,नगरसेवक म्हणून ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले,खासदार क्रीडा महोत्सवाचे काम अत्यंत जवाबदारीने पार पाडले,या महोत्सवा अंतर्गत ५५ हजार खेळाडू,१७ दिवसात २८ खेळातून शहराच्या १०० ते १५० मैदानात अभूतपूर्व प्रदर्शन करुन गेलेत हे त्यांच्यातील संघटन कौशल्य सिद्ध करणारे असल्याचे गडकरी म्हणले.
नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी जोशी हे विधान परिषदेच्या पटलावर न्याय भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या निवडणूकीत पराकोटीचे वैचारिक मतभेद असताना देखील केवळ भाजपचा उमेदवार हरावा यासाठी विरोधक एकत्रित आल्याची टिका त्यांनी केली.परिणामी येणारा काळ आपल्या सर्वांसाठी एक कसौटीच आहे की अश्या संधीसाधू विरोधकांना हरवून आपल्याला आपला उमेदवाराचा विजय खेचून आणायचा आहे,असे गडकरी म्हणाले.
ही निवडणूक इतर निवडणूकीसारखी नसून ही निवडणूक जिंकण्यासाठी ‘मेन टू मेन’ व’ हार्ट टू हार्ट ’संपर्क असणे गरजेचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्यान प्रत्येकी ५० मतदारांना व्यक्तिगत संपर्क साधून किवा फोन करुन मतदानासाठी प्रेरित करावे.संदीप जोशी यांच्या नावासमोर फक्त १ हा आकडा लिहावा,शब्दांमध्ये इतर काहीही लिहू नये, नाही तर त्यांचे मत हे अवैध गणल्या जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
संदीप जाेशी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन गडकरी यांनी याप्रसंगी केले.संदीप जोशी यांचे पिता दिवाकर जोशी हे शिक्ष् क आमदार होते.त्यांनी केलेल्या कार्यांना आज ही लोकं विसरले नाहीत.त्यांचीच पुण्याई संदीप जोशी यांच्यासोबतही आहे.या पूर्वी ज्यांनी ज्यांनी पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले त्या सर्वांनी पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत वाचा फोडली व पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.संदीप जोशी हे देखील पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देतील,असा आशावाद देखील गडकरी यांनी व्यक्त केला.

आमचे चॅनल subscribe करा