
नागपूर,ता. २५ नोव्हेंबर: नागपूर मतदार संघातील सर्व उमेदवार जेव्हा नागपूर सोडून शहराबाहेर प्रचारात व्यस्त आहेत त्याच वेळी विदर्भवादी उमेदवार नितिन रोंघे यांनी आपले जन्मगाव असलेल्या व तिथेच लहानपणापासून तर पदवीपर्यंत शिक्ष् ण घेतलेल्या नागपूर शहरातील हिंगणा भागातील अनेक शैक्ष् णिक संस्था,अभियांत्रिकी महाविद्यालये,वैद्यकिय महाविद्यालये व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्ष् केतर कर्मचारी,नर्सिंग स्टाफ तसेच त्यांच्या संघटनेच्या पदाधिका-यांशी आज बुधवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दिवसभर भेटीगाठी घेतल्या तसेच आपल्या उमेदवारीबद्दल माहिती प्रदान केली.
या प्रसंगी त्यांना सर्वच स्तरावरुन एक अराजकीय तसेच अभ्यासू विदर्भवादी, युवा व तडफदार उमेदवार म्हणून सर्व संघटना तसेच त्यांचा मित्र परिवार,इतर सामाजिक संघटना,यांनी त्यांच्या प्रचाराचे काम स्वयंफूर्तीने करुन नितीन रोंघे यांचा विजयाचा मानस व्यक्त केला. नितीन रोंघे यांनी त्यांना लहानपणापासून तर पदवीपर्यंत शिकविलेल्या सर्व गुरुवरांचे आर्शिवाद घेतले व सर्वांनी त्यांना आर्शिवाद प्रदान केले. इतकेच नव्हे तर त्यांनी अभियंता संघटना,वकील संघटना,पत्रकार तसेच काही पदवीधर मतदार संघात नाव असलेल्या पोलीस अधिका-यांचीही भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचे आश्वासन दिले.
नितीन रोंघे यांनी नागपूर पदवीधर मतदार संघात आघाडी घेतली असल्याने प्रस्थापित उमेदवारांनी नितीन रोंघे यांची धास्ती घेतली असल्याचे बोलले जात आहे.
नितिन रोंघे यांच्या प्रचाराची धुरा विदर्भ कनेक्टचे ॲड.मुकेश समर्थ,विदर्भ राज्य आघाडीचे ॲड निरज खांदेवाले, विदर्भ माझाचे महेश तेलंग, बळीराजा पक्ष्ाचे राष्ट्रीय अध्यक्ष् डॉ.महेंद्र धावडे, राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष्ाचे राष्ट्रीय अध्यक्ष् राजेश काकडे, केंद्रिय जनविकास पक्ष्ाचे राष्ट्रीय अध्यक्ष् डॉ.अरुप मुखर्जी,सर्वधर्म समभाव पक्ष्ाचे डॉ.वहिद पटेल,अंजना सदाशिवन,सामाजिक कार्यकर्ते स्पप्नील समर्थ,दिलीप नरवाडिया,नरेंद्र पालांदूरकर,राम आखरे, नीरज फुलझेले,आशिष डायग्वहाणे,अविनाश गणवीर यांनी सांभाळली असून पूर्व विदर्भ ही मंडळी नितीन रोंघे यांच्या विजयासाठी पिंजून काढत आहे.

आमचे चॅनल subscribe करा