

(संग्रहीत छायाचित्र)
पत्रकार अमित दुबे यांच्या वाहन अपघात तक्रारीबाबत केली अरेरावी
नागपूर,ता,२२ नोव्हेंबर:लकडगंज पोलीस ठाण्यातील बहूचर्चित वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांना ॲड.अंकिता शाह मारहाणी प्रकरणात वरिष्ठांकडून चांगलीच कानउघाडणी झाल्यानंतर देखील त्यांच्या वर्तवणूकीत कोणताही फरक पडला नसल्याचे आणखी एका तक्रारीवरुन निर्दशनास आले.पत्रकार अमित दुबे यांना जुलै महिन्यात लॉक डाऊनच्या काळात अंबाझरी मार्गावर एका टिप्परने बेजवाबदारपणे वाहन चालवित जोरदार धडक दिली यात ते जबर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध झालेत.पुढे रुग्णालयातून सुटी झाल्यावर त्यांनी त्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली,एवढेच नव्हे तर घटनेचे सीसीटीव्ही फूटेज काढून तपासणे हे पोलीसांचे कार्य असताना दुबे यांनी स्वत: नागपूर महानगरपालिकेच्या ७ व्या मजल्यावरील विभागातून सीसीटीव्ही फूटेज प्राप्त करुन अंबाझरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्ष् क गणेश पुलकावर यांच्या हवाली केले मात्र पाच महिन्यात या तक्रारीवर पुढे कोणतीही कारवाई अंबाझरी पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आली नाही.
याबाबत दुबे यांनी वारंवार चौकशीसाठी हिवरे यांच्याकडे चौकशीसाठी फोन केला असता ‘चुल्हे मे गया मॅटर,तूम कागज लाकर दो’अशी फोनवरच दमदाटी पीडीतसोबत केली.एवढेच नव्हे तर राष्ट्रपती पदक विजेते नरेंद्र हिवरे यांनी चक्क व्हॉट्स ॲपवर दुबे यांना ‘अब इतने महिने हो गये अब क्या करेंगे शिकायत करके?’असा उरफाटा सल्ला दुबे यांना देताच दुबे यांनी ‘यही घटना आपके बेटे के साथ होती तो?’असा सवाल हिवरे यांना केला!
६ जुलै रोजी दुबे हे आपल्या एका मित्रासोबत अंबाझरी मार्गावरुन दूचाकीवर जात असताना टिप्पर चालकाने अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवून दुबे यांना उडवून दिले.दुबे हे गाडीवरुन उसळून खाली पडले,ते जागेवरच बेशुद्ध झाले त्यांना हातावर देखील जबर मार लागला.त्यांना त्याच मार्गावरील एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.शुद्धिवर आल्यानंतर त्यांनी रविनगर येथील डॉ.सेनगुप्ता यांच्याकडे सीटी स्क़ॅन,एमआरआय इ. तपासण्या करुन घेतल्या. आज ही त्यांना मध्येमध्ये त्या दुर्घटनेमुळे चक्कर येण्याचा त्रास सुरु आहे.
त्या वाहनचालकाला अटक होऊन शिक्ष्ा मिळावी या न्याय मागणीसाठी दुबे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. आपल्या वयोवृद्ध आई-वडीलांना या घटनेमुळे जो मानसिक त्रास भोगावा लागला,असा त्रास व असे दु:ख इतर कोणाच्याही वाटेला येऊ नये यासाठी त्यांनी न्यायाचा मार्ग पत्करला मात्र खाकी वर्दीखालील पोलीस अधिका-यांना या बाबीचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून पडले.त्यांनी दुबे यांनाच गेल्या ५ महिन्यांपासून पोलीस ठाण्याचे हेलपाटे खाण्यास मजबूर केले.
अखेर दुबे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे रितसर लिखित तक्रार नोंदवली तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील तक्रारीची प्रत सोपवली.एका पत्रकार व राष्ट्रवादी पक्ष्ाचे मिडीया सेलचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ता असलेल्या उच्च विद्याभूषित व्यक्तिला जर खाकी वर्दी अश्या भाषेत व अश्या पातळीवर वागणूक देत असेल तर पोलीस ठाण्यात येणा-या सर्वसामान्य लोकांना कसा अनुभव येत असेल?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.माझ्याकडून सीसीटीव्ही फूटेज घेऊन MH 31DS 3823 हा महेंद्र कंपनीच्या गाडीचा क्रमांक देऊनही अंबाझरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एवढ्या संथ गतीने तपास करीत असतील तर पाणी नक्कीच कुठेतरी मुरले आहे,असा संशय त्यांनी तक्रारीत नमूद केला आहे.पत्रकार दुबे यांनाच वारंवार कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे मात्र कायदा हा अपघातग्रस्त पीडीत व्यक्तिंच्या घरी जाऊन पोलीसांनी कागदपत्रे जमा करावी असा असल्याचे दुबे हे सांगतात.
विशेष म्हणजे दुबे यांना हिवरे यांनी फोन करुन या विषयी ‘वारंवार मला फोन करुन विचारु नका’अशी तंबी दिली तसेच या पुढे सहायक पोलीस निरीक्ष् क गणेश पुलकावर यांच्याशी बोला,असा समज दिला,मात्र पुलकावर यांनी देखील दुबे यांच्याशी अरेरावीच्या भाषेत ‘गेल्या सहा महिन्यांपासून तुम्ही काय करत आहात?’असा उरफाटा प्रश्न विचारला. ६ जुलै रोजी अपघात झाल्यानंतर लगेच दुबे यांनी तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीचा तपास करुन न्यायालयात प्रकरण दाखल करणे हे पोलीस ठाण्याचे कर्तव्य होते,मात्र या प्रकरणाचा कोणताही तपास अंबाझरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे व त्यांच्या पूर्वी त्या पदावर असणा-या पोलीस निरीक्ष् क करे यांनी केला नाही.या बाबत दुबे यांनी पोलीस महासंचालक मुंबई यांना देखील पोलीसांच्या अश्या वर्तवणूकीबाबत सविस्तर तक्रार नोंदवली आहे. ‘सज्जनांचे रक्ष् ण व दुष्टांचे निर्दालन’असे बिरुद मिरवणा-या काही पोलीसकर्मींच्या अश्या असंवेदनशील वर्तूवणूकीविरोधात ते न्यायालयात न्यायासाठी दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे नुकतेच ॲड.अंकिता शहा यांच्या सोबतच्या मारहाणीच्या प्रकरणात नरेंद्र हिवरे यांची बदली लकडगंज पोलीस ठाण्यातून अंबाझरी पोलीस ठाण्यात करण्यात आली मात्र त्या प्रकरणातून कोणताही धडा हिवरे यांनी घेतला नसल्याचे या प्रकरणावरुन सिद्ध झाले.या प्रकरणात देखील पोलीस आयुक्तांनी त्यांना नागरिकांसोबत सज्जनतेने वागण्याची तंबी दिली आहे,हे विशेष.




आमचे चॅनल subscribe करा
