फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनमन नटवरा....रंगकर्मींनी केले रंगमंचाचे पूजन

नमन नटवरा….रंगकर्मींनी केले रंगमंचाचे पूजन

Advertisements

अंतर्मन कला अकादमीतर्फे नटेश्वराची प्रार्थना

नागपूर,७ नोव्हेंबर:  तब्बल आठ महिने कधी नव्हे तो रंगमंचाचा पडदा बंद होता. अनलॉक प्रक्रियेत नाट्यगृहे काही नियमानुसार खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रंगभूमी दिनालाच ही गोड भेट रंगकर्मींना मिळाली. यानिमित्त अंतर्मन कला अकादमीतर्फे सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे रंगमंच आणि नटेश्वराचे पूजन करून आता नव्या दमाने पुन्हा सादरीकरणासाठी कंबर कसण्याचा निर्णय रंगकर्मींनी घेतला आहे.

याप्रसंगी रंगमंच आणि नटेश्वराचे पूजन ज्येष्ठ अभिनेत्री मिनाताई देशपांडे आणि मनपा स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पिंटू झलके यांनी यावेळी उपस्थित सर्व कलावंतांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्यात आणि सर्व कलावंतांना रंगमंचावर अभिनय साकारताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

मिनाताई देशपांडे यांनीही ब-याच कालावधीनंतर सर्व रंगकर्मी सादरीकरणासाठी उत्सुक असून त्यांनी आता नव्या दमाने कामाला लागवे, असे आवाहन करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी नटेश्वराची आणि सरस्वतीची प्रार्थना करून भविष्यात उत्तमोत्तम कलाकृती ताकदीने सादर करण्यासाठी कलावंतांनी प्रार्थना केली.

अंतर्मन कला अकादमीचे अध्यक्ष कुणाल गडेकर यांनीही यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अकादमीचे सचिव दिलिप देवरणकर, मकरंद भालेराव, माधवी पांडे, अभय देशमुख, लता कनाटे, अनिल पालकर, राजेश पाणूरकर, अतुल शेबे, कविता भुरे, स्वप्नील बन्सोड, डॉ. प्रशांत प्रांजळे, डॉ. सुनील पुडके, प्रफुल्ल ठाकरे आणि अनेक कलावंत उपस्थित होते.

नव्या कलाकृती सादर करण्याचा उत्साह यावेळी सर्वच कलावंतांमध्ये होता. अनेक कलावंतांनी या कार्यक्रमाला सोशल माध्यमावर आणि दुरध्वनी करून शुभेच्छा दिल्यात.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या