फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशखतरों के खिलाडी...!

खतरों के खिलाडी…!

Advertisements

(शुक्रवार स्तंभ-‘कहानि पुरी फिल्मी है’)

रेवती जोशी-अंधारे

हे आयुष्य किती फिल्मी आहे नं! इतके ट्विस्ट-टन्र्स, सरप्राईजेस तर एखादा प्रथितयश फिल्मी लेखकही लिहू शकत नाही. आज आहे आणि उद्या नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेला प्रेमपट, ज्याने अनेकांच्या प्रेमकथांना नवीन उभारी दिली असेल, संसार थाटायला प्रोत्साहन दिले असेल तर दुसरीकडे निर्माता-दिग्दर्शकांची संपत्ती दुणावली असेल आणि तिकिटे ब्लॅक करणा-या पो-यांची एक वेळची पोटभरी केली असेल, असा “दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे!” हा प्रेमपट प्रदर्शित होऊन २५ वर्षे झालीत. २० ऑक्टोबर १९९५ ! एक हसरा, उमदा तरुण आणि संकोची, हुशार तरुणी यांच्याभोवती विणलेल्या या कथेतील सगळीच पात्रे अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात सहज दिसणारी! कदाचित म्हणूनच फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातील प्रेक्षकांवर या चित्रपटाची मोहिनी पडली. मुंबईच्या मराठा मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून हा चित्रपट लागलेला आहे. डिडिएलजेचे दररोजचे खेळ या चित्रपटगृहात लागायचेच आणि त्यात बहुतांश वेळा ते हाऊसफुल जात असत.

पण, कोरोनाकाळात चित्रपटगृहे बंद झालीत आणि डिडिएलजेचा रौप्यमहोत्सव थाटात साजरा करण्याच्या नियोजनावर पाणीच फिरले. आता, पुन्हा एकदा चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे, मराठा मंदीरने आजपासून थिएटर सुरू करीत, सगळ्यात आधी डिडिएलजे प्रदर्शित केला. हा देखील एक विक्रमच असावा. सोबतच, आदित्य चोपडा दिग्दर्शित हा चित्रपट आता आणखी १८ देशांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून चित्रपटगृह मालकांनी १६ ऑक्टोबर रोजी, सात महिन्यांपासून बंद असलेले टॉकीज उघडण्याची मागणी केली होती. वास्तविक केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासूनच थिएटर सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता त्यावर निर्णय घेत, महाराष्ट्र शासनाने आज (६ नोव्हेंबर)पासून राज्यातील टॉकीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी, पूर्ण नियमांचे पालन करण्याचे निर्देश असून, एकावेळी ५० टक्केच प्रेक्षकांची उपस्थिती थिएटरमध्ये असू शकणार आहे. म्हणजे, एक खुर्ची सोडून याप्रमाणे आसनव्यवस्था केली जाईल. हा सोशल डिस्टन्स पाळण्यासोबतच, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक राहणार आहे. एकूणातच, चित्रपटगृहात जाणे म्हणजे मनोरंजन कमी आणि काळजी जास्त असा विषय राहणार आहे.

गेले सात महिने आपल्या स्मार्टफोन्सने आपल्याला मनोरंजनाची जी नवी दालनं खुली करून दिलीयेत ना, ती बघता जगण्याचा धोका पत्करून जीवाचे मनोरंजन करण्याची रिस्क कोण घेणार आहे? हा प्रश्न राहणारच आहे. आपल्या नागपुरी भाषेत त्यांना “खतरों के खिलाडी” असंच म्हणावं लागेल. आता शासनाचे नियम पाळून पिक्चरला जायचं म्हणजे सूचनांची जंत्री सांभाळणं ओघानंच आलं. थिएटर सॅनिटाईज्ड् आहे का? तापमान-ऑक्सीजन मोजलं जातंय का? नियम पाळले जातायत का? इथपासून आपला मास्क-हेल्मेट (याला देखील विसरू नका), पाण्याची बाटली, सॅनिटायझर असा सगळा जामानिमा करावा लागणार आहे. एवढे सोपस्कार करून जो पिक्चर बघायला जायचं तो या धडपडीला सार्थ करणारा तरी असावा नाही तर कंपनी तरी चांगली असावी. जीवाचा पिक्चर करून आल्यानंतर, चुकून का होईना, पण सर्दी-ताप-खोकला यापैकी काहीही झालं तरी भलतंच “मनोरंजन” होईल.

अर्थव्यवस्थेत हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा हिस्सा आहे, हे खरंच आहे. सरकारने अजून शाळा आणि मंदीरांना उघडण्याची परवानगी दिलेली नाही. शेवटी पैसा बोलता है… हेच खरं ! मुद्दा एवढाच आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टिव्हीसारखी घरबसल्या सुरक्षित मनोरंजन देणारी माध्यमे असताना, टॉकीजमध्ये “खतरों के खिलाडी” बनून कोण जातंय?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या