फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणभाजपचे काँग्रेसीकरण! सुजय विखे पाटील झाले भाजपावासी

भाजपचे काँग्रेसीकरण! सुजय विखे पाटील झाले भाजपावासी

भाजपचे काँग्रेसीकरण! सुजय विखे पाटील झाले भाजपावासी
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर: विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे पाटील यांनी मंगळवार दि.१२ मार्च २०१९ रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भाजपात ‘विधीवत‘ प्रवेश घेतला.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,जलसंपदामंत्री गिरीष महाजन,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान ‘एकच वादा,सूजय दादा‘ अश्या घोषणाही निनादल्या. डॉ.सुजय विखे पाटल यांच्या भाजपा प्रवेशामुळे अहमदनगर आता भाजपचा बालेकिल्ला बनला असला तरी या कल्पनातीत पक्ष-प्रवेशामुळे ‘भाजपचे काँग्रेसीकरण‘ झाले असल्याची चर्चा महाराष्ट्रात चर्चिली जात आहे.
नाना पटोले यांचे ताजे उदाहरण डॉळ्यांसमोर असताना भाजपने पुन्हा कशाला विषाची परीक्षा घ्यावी अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये एकू येत आहे. अश्या ‘पक्ष प्रवेशा‘मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची निष्ठा डावलली जाते. संजय काकडे काँग्रेसमध्ये, अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्ये,शरद सोनवणे शिवसेनेत ‘कुणी गोविंद घ्या,कुणी गोपाळ घ्या‘ अशी सध्या एकूण राजकीय परिस्थिती झाली असल्याची टिका निष्ठावंतां मध्ये कुजबुजली जात आहे. गावोगावीचे ‘सुभेदार‘ यांना कोणत्याही पक्षाचा फक्त ‘खुंट’ लागतो तिकीटासाठी,पक्षाचे तत्वज्ञान,पक्ष निष्ठ वगैरे या बाबी दुय्यम असतात यांच्यासाठी,आता सारे ‘सरंजमदार‘भाजपा पुढे रांगा लावून उभे दिसतील परंतू त्यांना आपण प्रवेश देऊन कोणावर अन्याय तर करीत नाही ना याचे भान पक्ष नेतृत्वाने केले नाही तर भाजपाची ‘काँग्रेस‘झाल्याशिवाय राहणार नाही,असा ईशाराही देण्यास कार्यकर्ते विसरत नाही.
ऐन निवडणूकीत पक्ष प्रवेश करणाऱ्यांना पाच वर्षे आधी पक्षासाठी झिजू द्या मग त्यांना उमेदवारी देण्याची मागणी ही पुन्हा पुढे येऊ लागली आहे.एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पक्षात हा सुद्धा राजकीय खेळीचा भाग असून शकतो अशी देखील चर्चा सुरु आहे. अहमदनगरची जागा शेवटपर्यंत राष्ट्वादीने काँग्रसेसाठी सोडली नसल्याने सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. सुजय यांच्या भाजपप्रवेशामुळे नगर जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे, ‘सुजय यांनी पक्षात येताना कोणतीही अट घातलेली नाही,पण त्यांना नगरमधून उमेदवारी दिली जाईल‘असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट।केले आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या