फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमश्‍वानावरुन परिमंडळ २ च्या उपायुक्त विनिता शाहू यांच्या बंगल्यावर राडा

श्‍वानावरुन परिमंडळ २ च्या उपायुक्त विनिता शाहू यांच्या बंगल्यावर राडा

Advertisements

An Officer Placed a Retired Police Dog in a Shelter. Now He's Been Demoted.  - The New York Times

(संग्रहित छायाचित्र)

आरोपींविरोधात एफआयआर दाखल

नागपूर,ता. २४ ऑक्टोबर: पोलीस शिपाई आकाश प्रमोद कुबडे हे २०१८ पासून नागपूर शहर पोलिस विभागात कार्यरत आहेत. सध्या ते पोलिस मुख्यालयात कार्यरत असून जुलै २०२० पासून परिमंडळ २ च्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांच्या सिव्हिल लाईन्स येथील प्रेरणा बंगल्यावर कर्तव्यावर अाहेत. दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांचा लेब्रोडोर जातीच्या श्‍वानासोबत पोलिस शिपाई आकाश कुबडे हे फाटकाजवळ उभे असताना एका अनोळखी मुलाने हा कोणाचा कूत्रा आहे?येथे केव्हापासून आहे?अशी विचारपूस केली.हा त्यांचाच सहा महिन्यापूर्वी हरवलेला कूत्रा असल्याचा त्याने वाद ही घातला.

त्यावेळी हा कूत्रा विनिता शाहू यांचा पाळीव कूत्रा असल्याचे सांगितले. मात्र १८ ऑक्टोबर रोजी दूपारी साढे चार वाजताच्या सुमारास पोलिस शिपाई आकाश हे पुन्हा बंगल्याच्या मुख्य द्वाराजवळ कूत्रा घेऊन उभे असताना तोच इसम आणखी दोन अनोळखी इसम यांच्यासोबत आला व पुन्हा हा कोणाचा कूत्रा आहे अशी विचारपूस करु लागला.मी पुन्हा त्यांना हा कूत्रा मॅडमचा आहे असे सांगून तेथून निघून जाण्यास सांगितले.पण ते काहीच ऐकण्यास तयार नव्हते,ते मॅडमला भेटायचे असे बोलू लागले.

यानंतर पोलिस शिपाई आकाश यांनी बंगल्याचे फाटक बंद केले. तरी पण या तिन्ही इसमांनी बंगल्याचे फाटक उघडून जबरदस्ती शाहू यांच्या बंगल्यात प्रवेश केला. मी त्यांना विरोध केला असता माझ्याशी हूज्जत घातली परिणामी मी बंगल्यातील इतर स्टाफला बोलावेले तसेच सदर पोलिस स्टेशनला फोन करुन स्टाफ बोलावला.

थोडयाच वेळाने सदर पोलिस स्टेशनचा स्टाफ आला,मी त्यांना घटनेची माहिती दिली.सदर पोलिसांनी या तिघांना आपले नाव विचारले असता हरिश प्रेमचंद कांबळे,रेहान हरिश कांबळे तसेच सचिन यशवंत गेडाम,सर्व राहणारे ए.जी.ऑफिस कॉर्टर,प्रशासकीय इमारत क्र.१ जवळ नागपूर,असा पत्ता सांगितला.

या तिघांनी मॅडमच्या राहत्या बंगल्याच्या आत येऊन त्यांच्या कूत्र्याला जबरदस्ती आमिष दाखवून सोबत घेऊन जाण्यासाठी बेकायदेशीररित्या बंगल्यात प्रवेश केला. त्यांना विरोध केला असता त्यांनी हूज्जत घातली,माझ्या कामात अवरोध निर्माण केला,त्यामुळे या तिघांच्या विरोधात मी कायदेशीर तक्रार नोंदवित आहे,अशी तक्रार सदर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली.
या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम १८६,कलम ३४ तसेच कलम ४४७ लावण्यात आले आहे.
आरोपींनी अटक पूर्व जामिन मिळवल्याचे सांगितले जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या