फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजस्थायी समिती सभापतींनी सादर केला २५०० कोटींचा अर्थसंकल्प

स्थायी समिती सभापतींनी सादर केला २५०० कोटींचा अर्थसंकल्प

Advertisements


वाढीव बजेट पहील्यांदाज ४७ कोटींनी कमी!

फूगवट्याला फाटा देऊन वास्तविक बजेट मांडल्याचा पिंटू झलके यांचा दावा

नागपूर,ता. २० ऑक्टोबर: महानगरपालिकेच्या इतिहसात पहील्यांदाज स्थायी समितीचे सभापती विजय(पिंटू)झलके यांनी फूगवट्याला फाटा देऊन २०२०-२१ साठीचा तुटीचा अर्थसंकल्प आज मंगळवार दि. २० ऑक्टोबर रोजी मनपाच्या विशेष सभेत ऑन-लाईन पद्धतीने सादर केला.२५०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना शिल्लक २३१ कोटीं मिळून एकूण २७.३१ कोटींचा अर्थसंकल्प पटलावर मांडला. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा केली नसून अंत्योदय योजना,शवपेटी यासारख्या आरोग्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण असणा-या दोन योजनांचा मात्र समावेश करण्यात आला.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पार पडलेल्या पत्र-परिषदेत बोलताना झलके हे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात सर्व नगरसेवकांची जी काही विकास कामे ही थांबली होती,ज्यांचे कार्यादेश झाले होते,प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती,अश्‍या सर्व योजनांसाठी महसूली खर्च ६६.१५ तर भांडवली खर्च १९७.७९ अश्‍या एकूण २६३. ९४ काेटींच्या कामांना माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात स्थगिती देण्यात आली होती.ज्या प्रकल्पांची कामे झाली मात्र भूगतान झाले नाही अश्‍या प्रकल्पाची २९ कोटी,भांडवली खर्च ५४.६० कोटी,अदत्त भूगतान ८३.६० कोटी असे एकूण ३४७.५४ कोटींच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या सर्व कामांच्या याद्या,झोनस्तरावरील विविध राशींच्या आवंटनासह,कार्यादेश,तारखेसह परिशिष्टात समावेश केला असल्याची माहिती त्यांनी दिली.याप्रसंगी मनपाला प्राप्त होणा-या उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांची सविस्तर माहिती त्यांनी सादर केली.एकूण उतपन्न २५०० कोटी तर एकूण २७३०.७५ कोटींच्या व्यय पदांची माहिती त्यांनी दिली.

करोनाचा काळ असल्यामुळे स्थायी समितीचा सभापती म्हणून रुजू झाल्यानंतर जवळपास ८ महिने नागपूर शहराच्या विकासाकरीता काहीच करता आले नाही. माजी आयुक्तांनी जवळपास ३४७ कोटींच्या विकास कामांना स्थगिती दिली होती. या अर्थसंकल्पात वास्तवादी बजेट सादर करुन जी विकास कामे थांबली अाहेत त्यांना गती प्रदान करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पिंटू झलके हे म्हणाले.
माझ्याजवळ फक्त तीनच महिन्याचा कार्यकाळ आहे,कारण पुढील वर्षी फेब्रुवरीमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.हे सुधारित अर्थसंकल्प सादर करतील.परिणामी तीन महिन्यातच उत्पन्न वाढेल हा अर्हिभाव मी बाळगला नसल्याचे त्यांनी सांगितले.जो काही कार्यकाळ आहे त्यात नागपूरकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ताधारी भाजपच्या एकूण १३ वर्षांच्या काळात पहील्यांदाज तुटीचे बजेट मांडले गेले,वाढीव अर्थसंकल्प असतो मात्र पहील्यांदाज ४७ कोटींनी कमी बजेट मांडण्यात आले. शास्ती संबंधी बोलताना हा अधिकार मनपा आयुक्तांचा असून त्यांनी शास्ती माफ करुन करोनाच्या काळात नागरिकांना दिलासा द्यावा,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अनुसयाबाई समुपदेशन केंद्र बंद करण्याचा अधिकार हा महापौर तसेच सभागृहाचा आहे.मात्र माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभागृहाच्या पटलावर हा विषय न ठेवता हे केंद्र मुंढे यांनी सरसकट बंद केले.

महापालिकेची ऑन लाईन ’मूक’सभा!ऐतिहासिक बजेट आहे का?विरोधकांची टिकाhttps://sattadheesh.com/?p=9180

नगरसेवकांना मिळणार विकासकामांसाठी २० लाख रुपये-
गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व पक्ष्ीय नगरसेवकांची एकच ओरड होती,त्यांना त्यांच्या प्रभागात साधे गडरचे चेंगर करण्यासाठी देखील निधी मिळत नाही,मात्र पिंटू झलके यांनी वार्ड फंड अंतर्गत २० लाख रुपये प्रति नगरसेवकांसाठी तरतूद केली असून गेल्या वेळी ही रक्कम २१ लाख एवढी होती. मालमत्ता कर,जाहीराती,पाणी कर,एलबीटी इ. आयचे प्रमुख स्त्रोत करोनामुळे आटल्यामुळे व्ययाचे स्त्रोत देखील कमी करावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त आकडे फूगवून सांगण्यापेक्ष्ा लक्ष्य पूर्ण झालं पाहिजे,असे ते म्हणाले.

आरोग्यावर खर्च होणार ७० कोटी-
करोना महामारीने सत्ताधा-यांचेही डोळे चांगलेच उघडल्यामुळे आरोग्य या बाबीवर खर्चासाठी ७० कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अंत्योदय चालता-फिरता दवाखाना ही योजना अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.शहरातील दहा क्ष्ेत्रीय कार्यालयाकरिता योग्य ती संयत्रे लाऊन व औषधांसह अशा अत्याधुनिक पद्धतीने हे चालते-फिरते दवाखाने असणार आहेत.याशिवाय शहारातील दहा झोन कार्यालयांमध्ये व त्यांच्या अंतर्गत येणा-या नागरीकांसाठी आरोग्य नागरि सेवा देण्याच्या दृष्टिकोणातून मृतदेहांसाठी १० शितपेटी खरेदी करणे तसेच गांधीबाग क्ष्ेत्रीय कार्यालयाकरिता एक शववाहिका खरेदी करणे याची तरतूद करण्यात आली असून या शितपेटी नागरिकांना माफक दरावर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती झलके यांनी दिली.
थोडक्यात हा अर्थसंकल्प राबविण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवरी २०२१ असा तीन महिन्यांचाच कालावधी झलके यांना मिळणार आहे.तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चालू वित्तीय वर्षासाठी २ हजार,६२४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. झलके यांच्या आधीचे सभापती प्रदीप पोहोणे यांनी ३ हजार १९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता,हे विशेष!पोहोणे यांच्या अर्थसंकल्पाला कात्री लावत प्रशासनाने तो २ हजार ६९८ कोटींपर्यंत आणला होता. झलके यांनी त्यात आणखी कपात करुन त्यांच्या हातात असणा-या त्रैमासिकसाठी २५०० कोटींचा अर्थसंकल्प मांडला.

संतुलित आणि वास्तवादी अर्थसंकल्प-महापौर
याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांनी स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतूक करुन हा संतुलित व वास्तवादी अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. आधीचे अर्थसंकल्प अवास्तविक किवा फूगवट्याचे नव्हते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.सभापतींना केवळ तीन महिन्यांसाठीचाच कालावधी मिळाला असून आयुक्त हे पुन्हा फेब्रुवारीमध्ये सुधारित अर्थसंकल्प मांडतील त्यामुळे अाधीच फूगवलेलं बजेट मांडण्याचे टाळून वास्तविक बजेट सादर करण्याची सर्कसच जणू सभापतींनी साधली असल्याचे महापौर म्हणाले.करोना काळातच सहा महिने हातातील निघून गेले. उर्वरीत तीनच महिने हातात आहे.

एलबीटीविषयी बोलताना महापौर म्हणाले,की संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपूर शहरातच एलबीटी हा व्यापा-यांशी संबधित विषय लागू आहे.याबाबत वन टाईम सेटलमेंटसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र शासन दरबारी अद्यापही हा विषय भिजत घोंगडे ठरला आहे. करोनामुळे शहरातील नागरिक हा आधीच आर्थिक भुर्दंड सोसत आहे,त्यामुळे पाणी कर,मालमत्ता करात त्याला दिलासा मिळणे गरजेचे आहे. शास्ती देखील ५० टक्के माफ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात अाला आहे.आयुक्तांनी किमान शास्ती माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा.

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर चिमटा काढताना मुंढे हे नेहमीच मनपावर ७०० कोटींचे देणे शिल्लक असल्याचे सांगत होते.या अर्थसंकल्पात ते सुद्धा देणे ठेऊन आजचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले.या अर्थसंकल्पात बुधवार बाजार,ऑरेंज स्ट्रीट इ.अनेक याेजनांचा समावेश करण्यात आला आहे.अर्धवट सिमेंट रस्ते यावर नेहमी आेरड होत असते,यासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली अंत्योदय योजनेअंतर्गत शितपेटी व शववाहिका यासारख्या सेवाभावी योजनांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
थोडक्यात विपरित परिस्थितीत संतुलित बजेट सादर करण्याची सर्कस सभापती यांनी लीलया पेलली अश्‍या शब्दात महापौरांनी अर्थसंकल्पाचे कौतूक केले.७ व्या वेतन अयोगाविषयी बोलताना शेवटी ते कर्मचारी आमचे आहेत.राज्य शासनाकडे मनपा कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा यासाठी वारंवार प्रस्ताव पाठविला आहे.चंद्रपूरच्या मनपात ७ वा.वेतन अायोग लागू होतो मग नागपूरच्या मनपा कर्मचा-यांसाठी का नाही लागू होत?प्रशासनाने शासनाला पुन्हा पत्र-व्यवहार करावा,७ वा.वेतन आयोग लागू व्हावा,अशी आमची ईच्छा असल्याचे महापौर म्हणाले.

पत्र-परिषदेला सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव,ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी,विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते.

उत्पन्नाचे स्त्रोत-
ईतर शासकीय अनुदान-नाविन्यपूर्ण योजना अनुदान- ५० कोटी
व्यवसाय कर अनुदान/मुद्रांक शुल्क अनुदान- ७५ कोटी
वस्तु व सेवा कर सहाय्यक अनुदान- १२३६ कोटी
मलेरिया निर्मुलन करीता अनुदान- ५ कोटी
हत्ती रोग ‘फ’करिता अनुदान- ५ कोटी
पोलीओ निर्मुलन व इतर शासकीय अनुदान-०.१ कोटी
प्राथमिक शाळेकरिता अनुदान- ३५ कोटी
माध्यमिक शाळेकरिता अनुदान-०.००
रस्त्याच्या दुरुस्ती व निर्माण करीता अनुदान- ५ कोटी
अकृषिक निर्धारणाव मिळणारे शासकीय,करमणूक कराबद्दल,जनगणना खर्चावर,नझुल अनुदान- ०.५ कोटी
विकास आराख्डयानुसार प्राप्त अनुदान- ०.१ कोटी
कस्तुरबा वाचनालयासाठी सरकारी अनुदान- ०.५ कोटी
मोटार करा इतके सरकारी अनुदान-०.१ कोटी
तातडीची पाणी पुरवठा योजना व आयसीएलईआय अनुदान आय-०.५
एकूण-१४११.१८
याशिवाय स्थानिक संस्था कर(एल.बी.टी) बकाया सामान्य कर,चालु अग्नि कर,बकाया अग्नि कर,बकाया विद्युत कर, चालु विद्युत कर, पथ कर,शिक्ष् ण उपकर, वृक्ष् उपकर,सफाई कर, पाणी कर, मलजल लाभ कर, थिएटर कर,घनकचरा व्यवस्थापन कर
एकुण- २२३.७४ कोटी
याशिवाय जलप्रदाय विभाग,बाजार वसुली, भांडवली अनुदान इ.
एकूण-२२३.७४ कोटी
स्थावर विभाग,अग्निशामक विभाग,नगररचना विभाग,लोककर्म विभाग, आरोग्य विभाग,लोककर्म विभाग बी.ओ.टी प्रकल्प,विद्युत विभाग, हॉटमिक्स प्लान्ट विभाग,इतर विभागांची करेत्तर आय
एकूण- ३६५.४६
इतर उत्पन्न-५७.९८
भांडवली अनुदानाद्वारे उत्पन्न-
आमदार निधी,खासदार निधी, उपराजधानी नागपूर शहर विकासासाठी प्राप्त विशेष शासकीय अनुदान/मुलभूत सोयी सुविधा,जेएनएनयूआरएम प्रकल्पाचा तसेच इतर मोठ्या स्वरुपाच्या भांडवली खर्चाच्या योजनांसाठी शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान,अमृत अंतर्गत विविध प्रकल्प/विकास कामांकरिता अनुदान,सिमेंट रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत राज्य शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान व नासुप्र कडून प्राप्त होणारे अनुदान,महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरि उत्थान महाअभियान,सौर उर्जा अभियान, घनकचरा व्यवस्थापन अनुदान,दलित वस्तीतील कामाकरिता शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान,एससी/एसटी व नवबौद्धांसाठी घरकुल योजनेककरिता शासनाकडून गलीच्छ वस्ती विभागाकरिता प्राप्त होणारे अनुदान इ.

एकूण उत्पन्न- २५००.०० कोटी

असा जाणार पैसा-
एकूण आस्थापना व्यय- ३६८.४९
एकुण प्रशासकीय व्यय-७२.४६
एकुण प्रवर्तन/सुस्थिती/दुरुस्ती व्यय-४३९.१९
सर्व महसुली कार्यात्मक समुहाचा एकुण इतर व्यय-०.०१
मनपाच्या योजना व कार्यक्रम पूर्ण करणे/अंशदान/आर्थिक सहाय्य-२१०.१९
एकुण भांडवली निर्माण व्यय-८६७.३२
सर्व भांडवली एकुण अनुदान/आर्थिक सहायता व्यय-२८३.५६
भांडवली एकुण कर्ज परतफेड/व्याज/वित्तीय आकार व्यय-८०.११
सर्व कार्यात्मक समुहाचा एकुण निक्ष्ेप व ठेवी व्यय-६५.६७
सर्व कार्यात्मक समुहाचा एकुण अग्रिम व्यय- १२.०५

एकूण व्यय- २७३०.७५ कोटी
………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या